ताज्या घडामोडी

*अंबाजोगाईत आयएमएच्या वतीने एक दिवसीय आयएमएकॉन वैद्यकीय परिषद थाटात संपन्न – डॉ.नवनाथ घुगे*

अंबाजोगाईत आयएमएच्या वतीने एक दिवसीय आयएमएकॉन वैद्यकीय परिषद थाटात संपन्न – डॉ.नवनाथ घुगे


———————————————
*अंबाजोगाई/प्रतिनिधी*
अंबाजोगाई शहरात आयएमए अंबाजोगाईच्या वतीने रविवार दि.१२ जानेवारी रोजी स .९ ते सायं.५ या वेळेत एक दिवसीय आयएमएकॉएम वैद्यकीय परिषद मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाली. या आयएमएकॉन मध्ये विद्यमान काळातील वैद्यकीय क्षेत्रातील बदल व तंत्रज्ञानाच्या सहकार्याने होत असलेली प्रगती यावर विचार मंथन पार पडले असल्याची माहिती आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. नवनाथ घुगे यांनी सांगितले.
अंबाजोगाई शहरातील हॉटेल पियुष इन या ठिकाणी आयएमएकॉन परिषदेचे आयोजन रविवार दि. 12 जानेवारी रोजी करण्यात आल. या आयएमएकॉन परिषदेला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर,अधिव्याख्याते व इतर नामांकित डॉक्टरांनी मार्गदर्शन करून या परिषदेची उंची वाढवली. या परिषदेचे उद्घाटन आयएमएचे राज्याचे नियोजित अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी हे होते तर अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. ग्रा.वै.रू. व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे हे होते तर व्यासपीठावर स्वा.रा.ती. रुग्णालयातील डॉ. अभिमन्यू तरकसे ,आयएमएचे अंबाजोगाई अध्यक्ष डॉ.नवनाथ घुगे, आयएमएचे सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.राजेश इंगोले, दंतरोग तज्ञ डॉ.नरेंद्र काळे,स्वा.रा.ती रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ.गणेश तोंडगे,एम्पाच्या अध्यक्ष डॉ. सुलभा पाटील, आयएमएचे अंबाजोगाई सचिव डॉ .सचिन पोद्दार आदी मान्यवर उपस्थित होते.
या परिषदेचे प्रास्ताविक डॉ.नवनाथ घुगे यांनी करताना सांगितले की, वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस बदल होत असून ते बदल समजावून घेत आपण सुद्धा त्यामध्ये बदल करून घेण्याची गरज आहे. नवनवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान बाजारात येत आहेत त्याचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात इतर क्षेत्राप्रमाणे झपाट्याने बदल होत आहेत ते बदल स्वीकारून आपल्या परिसरातील रुग्णांचे योग्य व अचूक निदान व्हावे आणि उपचार व्हावेत यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे डॉ.नवनाथ घुगे यांनी सांगितले. तर आयएमएचे नियोजित प्रांताध्यक्ष डॉ.संतोष कुलकर्णी यांनी उद्घाटक म्हणून अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले बोलताना म्हणाले की, आयएमए ही संस्था देश पातळीवर काम करणारी संस्था आणि संघटन आहे. या संघटनेची कनेक्टिव्हिटी ही संपूर्ण जगाशी आहे. जगभरात वैद्यकीय क्षेत्रात क्षेत्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. जगाचे ज्ञान व होणारे बदल भारतातील डॉक्टर बांधवांना ज्ञात व्हावेत व त्यावर सर्वांनी काम करावे यासाठी अशा परिषदा मैलाचा दगड ठरत आहेत.

अंबाजोगाईत आयएमएकॉन परिषदेच्या माध्यमातून तज्ञ व अभ्यासू आणि संशोधन करणाऱ्या निष्णात डॉक्टरांना निमंत्रित करून त्यांच्या या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले बदल आणि त्यावरील उपचार व उपाय अचूक व्हावे यासाठी ही परिषद महत्त्वाची आहे.आयएमए अंबाजोगाईने याबाबतीत पुढचे पाऊल टाकून उत्कृष्ट नियोजन आणि आयोजन करून सर्वसमावेशक अशी परिषद घेतली आहे.येणाऱ्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन डॉ. संतोष कुलकर्णी यांनी केले.यावेळी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, डॉ.राजेश इंगोले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .

सकाळी 9.30 वाजता कावीळ व पोटविकार या विषयावर लातुर येथील पोटविकार तज्ञ प्रविर गंभीरे यांनी मार्गदर्शन केले तर यात डॉ.नवनाथ घुगे, डॉ.गणेश तोंडगे, डॉ.अनिल भुतडा हे सहभाग नोंदविला. सकाळी 10.15 वाजता रक्तदान या विषयावर अंबाजोगाई येथील हदयरोग तज्ञ डॉ.दिपक कटारे यांनी मार्गदर्शन केले यात डॉ.मधुकर कांबळे, डॉ.दिलीप नागरगोजे व डॉ.गोपाळ पाटील यांनी सहभाग. सकाळी 11 वाजता थायरॉईड विकार या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील अंर्तग्रंथी तज्ञ डॉ.निलेश लोमटे यांनी मार्गदर्शन केले यात परळी येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ.शालीनीताई कराड, डॉ.वैशाली भावठाणकर, डॉ.संदिप थोरात यांचा सहभाग नोंदविला. दुपारी 12.30 वाजता मधुमेह या विषयावर मधुमेह तज्ञ डॉ.संजीव इंदुरकर यांनी मार्गदर्शन केले यात डॉ.शुभदा लोहिया, डॉ.प्रल्हाद गुरव, डॉ.सुनिल जाधव यांचा सहभाग घेतला . दू .2 वाजता रक्तक्षय व रक्तविकार या विषयावर रक्तविकारतज्ञ डॉ.मनोज तोष्णीवाल यांनी मार्गदर्शन केले यात डॉ.अमृता पाटील, डॉ.योगीनी थोरात, डॉ.शारदा इरपतगिरे हे सहभाग घेतला. दुपारी 2.45 वाजता मिरगी व मेंदु संदर्भातील विषयावर सोलापुर येथील मेेंदुविकार या विषयावर गेली अनेक वर्षे सेवा देणारे डॉ.अश्विन वळसंगकर यांनी मार्गदर्शन केले तर यात डॉ.संजय चव्हाण, डॉ.वर्षा कस्तुरकर, डॉ.सचिन चौधरी हे सहभाग घेतला. दुपारी 3.30 वाजता वात विकार या विषयावर वात विकार तज्ञ डॉ.अमोल राऊत यांनी मार्गदर्शन केले तर यात डॉ.अनिल मस्के, डॉ.सारिका शिंदे, डॉ.रचना जाजु आदीनी सहभाग घेतला. दुपारी 4.15 वाजता हदयविकार संबंधी लातुर येथील प्रसिद्ध हदयरोगतज्ञ डॉ.संजय शिवपुजे यांनी मार्गदर्शन केले यात डॉ.अनुप पाटील, डॉ.मनिषाताई फड, डॉ.राहुल धाकडे, डॉ.राजेश पाटील यांनी सहभाग घेतला.ही आयएमएकॉन परिषद यशस्वी करण्याठी डॉ. नवनाथ घुगे, डॉ अनिल भूतडा,डॉ सचिन पोतदार,डॉ नितिन चाटे, डॉ. अरुणा केंद्रे अध्यक्ष महिला आघाडी, डॉ. विनोद जोशी, डॉ निलेश तोष्णीवाल, डॉ. सुधीर धर्मपात्रे, डॉ. अतुल शिंदे, डॉ. राजश्री धाकडे, डॉ. स्नेहल होळंबे, स्त्री रोग विभागातील सर्व डॉक्टर्स, आय. एम.ए. व अम्पाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!