अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात माऊली नगर मध्ये गोळीबार कोणीही जखमी नाही, फॉरेन्सिक टीम येणार
अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात माऊली नगर मध्ये गोळीबार कोणीही जखमी नाही, फॉरेन्सिक टीम येणार असल्याचे वृत्त
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगर मध्ये रहात असलेल्या नवनाथ कदम यांच्या मुलावर रेणापूर येथील रहिवासी असलेल्या गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आसून यात कोणीही जखमी झालेले नसले तरी या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा राज्यच नव्हे तर देशात गाजत असताना आणि अंबाजोगाई शहरात सुजित सोनी या व्यापाऱ्यावर हल्ला करून लुटण्याची घटना ताजी असतानाच शहरातील मोरेवाडी परिसरात असलेल्या माऊली नगर मध्ये रहात असलेल्या नवनाथ कदम यांच्या सिद्धेश्वर या मुलावर रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील रहिवासी असलेल्या गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात कोणीही जखमी झालेले नाही.
प्राप्त माहिती नुसार
सदरील चव्हाण हा युवक कदम यांच्या पत्नी शेश्या कदम यांना मागील काही दिवसा पासुन कौटंबिक वादातून सतत धमकी देत होता. काही दिवसा पूर्वी या युवकाच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन ला तक्रार ही देण्यात आलेली असून आज सकाळी तो कदम यांच्या घरी आला आणि वाद घालत कदम यांच्या सिद्धेश्वर या मुलावर गोळीबार केला. सुदैवाने ही गोळी त्याला लागली नाही व मोठा अनर्थ टळला.

गोळी झाडणाऱ्या युवका कडे कुठलाही शस्त्र परवाना नसून त्याने घावटी कट्ट्याचा वापर केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आसून तपास कामी फॉरेन्सिक टीम ला पाचारण करण्यात आले आसल्याचे वृत्त आहे. अधिक तपास पो नी विनोद घोळवे हे अधिक तपास करीत आहेत.
