भीषण अपघाताने राजा-राणीचा सुखाचा संसार उद्ध्वस्त; ५ वर्षाची चिमुकली पोरकी, हृदय हेलावणारी घटना
भीषण अपघाताने राजा-राणीचा सुखाचा संसार उद्ध्वस्त; ५ वर्षाची चिमुकली पोरकी, हृदय हेलावणारी घटना
मुंबई (प्रतिनिधी)
आज पहाटेच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका जोडप्याचा समावेश आहे तर या जोडप्याची पाच वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली आहे तिच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. आई-वडिलाच्या मृत्यूने वयाच्या पाचव्या वर्षी चिमुकली पोरकी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई- नाशिक महामार्गावर आज१५ रोजी पहाटे ३.३४ वाजता झालेल्या पाच वाहनांचा विचित्र अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. तर या जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे जखमींवर ठाणे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पियुष पाटील आणि रूंदा पाटील या आई वडिलांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची 5 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. या मुलीवर शहापूर येथील क्रीस्टीकेअर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अवघ्या वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांचा आधार गेल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जोडपे अमळनेरचे रहिवासी
अमळेर येथील रहिवासी असलेले पियुष पाटील हे मुंबई महापालिकेत नोकरीला होते, तर वृंदा पाटील या बोरगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत युवा प्रशिक्षणार्थी होत्या. हे जोडपे चोपडा बदलापूर ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत होते. त्यांची बस मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथील पुलावर आल्यानंतर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बसचा अपघात झाला. या पाच वाहनांच्या विचित्र अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला तर त्यांची 5 वर्षाची चिमुकली पोरकी झाल्या मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
