सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील अतिक्रमण धारकावर चालवले बुलडोजर अनेक दुमजली इमारतीस बसला फटका
सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील अतिक्रमण धारकावर चालवले बुलडोजर अनेक दुमजली इमारतीस बसला फटका
अतिक्रमित जागेवर पक्के बांधकाम करणे आले अंगाशी, नुकसान सहन करण्याची वेळ
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
नगर परिषद पाठोपाठ आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण धारकावर बुलडोजर सुरू असून स्वतःचे नुकसान टाळण्या साठी अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येऊन ही ज्या अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे काढून घेतली नाहीत आशा दोन दोन मजली इमारतीवर बुलडोजर सुरू असल्याने अनेकांना नुकसान सोसावे लागत आहे.
केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरातील रस्त्या साठी कोटयावधी रुपयांचा फंड उपलब्ध झाल्या मुळे शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत, होत आहेत मात्र शहरातील अतिक्रमणाची समस्या काही सुटता सुटायला तयार नाही. अंबाजोगाई शहरातील नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारा एकही रस्ता असा नाही की ज्या रस्त्यावर अतिक्रमण नाही.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी आय ए एस अर्पिता हुबे, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे सह सर्व न प च्या टीमने स्वतः रस्त्यावर उतरत 2 दिवस नगर परिषदेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस स्टेशन समोरील व्यापारी संकुल या सह बस स्थानक ते पाटील चौक या रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा उगारताच अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन आपली अतिक्रमणे काढून घेतली.


नगर परिषद हद्दी प्रमाणेच संत भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे सदर बाजार, दवाखाना, मोरेवाडी मार्गे यशवंतराव चव्हाण चौक, लातूर टी पॉईंट व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रमाबाई चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या प्रमुख रस्त्यावर नव्याने बांधलेल्या नाल्यावरील अतिक्रमणा सह रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आतिक्रमणे झाली असून रस्त्याच्या मध्या पासून दोन्ही बाजूची 50 फुटाच्या आतील सर्व अतिक्रमणे काढण्यास आज छत्रपती शिवाजी महाराज चौका मधून सुरवात झाली.
प्रशासनाने स्वा रा ती रुग्णालया कडे जाणाऱ्या रस्त्यावरील शासकीय कार्या लयाच्या इमारतीच्या रस्त्यावर आलेल्या संरक्षण भिंती अगोदरच 50 फुटा बाहेर घेऊन नागरिकांना जागृत केले होते. आज या रोड वर जिल्हा पोलिस प्रमुख नवनीत कावत यांनी दिलेल्या 1 डी वाय एस पी, 2 पोलीस निरीक्षक, 40 पोलीस कर्मचारी, 20 महिला कर्मचारी, 2 डी सी एम वाहने, 2 आर सी पी प्लाटून या पोलीस बंदोबस्ता सह सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, महसूल विभागाचे कर्मचारी यांच्या सह न प च्या मुख्याधिकारी आय ए एस अर्पिता हुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपअभियंता गोविंद मुंडे, उप अभियंता मळेकर, उपअभियंता सचिन कावळे, उपअभियंता गुडवाले, शाखा अभियंता गोविंद शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत अतिक्रमणे काढण्यास सुरवात केली. पोकलेन, जे सी बी, टिप्पर सह अन्य वाहनांच्या सहकार्याने या रस्त्यावरील, दोन मजली इमारती सह पत्र्याचे बांधकाम झालेली अतिक्रमणे काढणे सकाळ पासून सुरू आहे. प्रचंड मोठा पोलीस फाटा व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने अतिक्रमण धारक हतबल झाले असून बिन बोबाट अतिक्रमणे काढताना दिसत आसून सूचना देऊन ही मागील 3 दिवसात ज्यांनी अतिक्रमणे काढून घेतलेली नाहीत त्यांना नुकसान सहन करण्याची वेळ आलेली आहे हे मात्र निश्चित.
येल्डा रोड व रेणुका देवी रोड वरील अतिक्रमणे काढणे आवश्यक
आ नमिता ताई मुंदडा यांनी श्री मुकुंदराज मंदिर मार्गे येल्डा कडे जाणारा रोड व श्री रेणुका माता मंदिर कडे जाणाऱ्या रोड च्या कामासाठी निधी उपलब्ध केलेला असून या दोन्ही रस्त्यावर सुरू झालेले रस्त्याचे काम काही अतिक्रमण धारकांनी आडवलेले आहे. प्रशासनाने सध्या उपलब्ध झालेल्या पोलीस बंदोबस्ताचा वापर करून या दोन्ही रस्त्यावरील अतिक्रमण काढले तर या रस्त्याचे काम करण्यास कंत्राट दारास सोयीचे होणार आहे.
*नुकसान टाळण्यासाठी फिरते पथक आवश्यक*
आज पर्यतच्या अनुभवा नुसार आज अतिक्रमणे काढली की परत आठ दिवसात परस्थिती जैसे थे होते. पुन्हा ज्या वेळी ती काढली जातात त्या वेळी अतिक्रमण धारकांचे ही मोठया प्रमानावावर नुकसान होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांनी ईतर शहरा प्रमाणे कायम स्वरूपी एक फिरते पथक निर्माण करावे अशी जनते मधून मागणी होत आहे.
