चोरीच्या उद्देशाने आलेल्या तरुणास नागरिकांनी पकडून दिला बेदम चोप अंबाजोगाई शहरातील घटना
चोरीच्या उद्देशाने आलेल्या तरुणास नागरिकांनी पकडून दिला बेदम चोप अंबाजोगाई शहरातील घटना
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
चोरीच्या उद्देशाने आलेल्या तीन तरुणा पैकी एकास कॉलनी मधील नागरिकांनी पकडून बेदम चोप दिल्याची घटना अंबाजोगाई शहरातील रिंगरोड लगत असलेल्या मानवलोक समोरील कॉलनी मध्ये काल रात्री घडली.
मागील आठ दिवसा पासून अंबाजोगाई शहरातील काही भागात चोरट्याने धुमाकूळ घातला असून रिंगरोड लगत असलेल्या मानवलोक समोरील एका कॉलनी मध्ये ही चोरट्याने तीन दिवसा पूर्वी काही घरा मध्ये हात साफ केला होता. त्यावेळ पासून या कॉलनी मधील नागरिक सतर्क झाले होते. काल रात्री पुन्हा चोरट्याने या कॉलनी मध्ये शिरकाव करून घर साफ करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी जागरूकता दाखवल्याने दोन तीन जण त्या ठिकाण हुन पळून जाण्यात यशस्वी झाले मात्र एक जण जमावाच्या तावडीत सापडला.
या जमावाने त्याला बेदम चोप दिला असून या चोरट्यास स्वा रा ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या संदर्भात पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला असता सदर आरोपी हे परळी येथील रहिवाशी असून शिकलकरी समाजाचे आहेत अशी माहिती प्राप्त झाली.
