ताज्या घडामोडी

सरंपच संतोष देशमुखांना मारतानाचा व्हिडिओ कॉल कोण पाहत होतं? पोलिस तपासात झालं उघड

सरंपच संतोष देशमुखांना मारतानाचा व्हिडिओ कॉल कोण पाहत होतं? पोलिस तपासात झालं उघड

धनजंय देशमुख सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार तर मस्साजोगच्या गावकऱ्यांचा मंगळवारी सामूहिक आत्मदहनाचा ईशारा

बीड (प्रतिनिधी)

  सरपंच देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आसून ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारहाण केली जात होती, त्यावेळी एका आरोपीनं घटनास्थळा वरून एक व्हिडीओ कॉल केला होता हा व्हिडीओ कॉल कोण पहात होते हे पोलीस तपासात उघड झाले आसून सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनजंय देशमुख हे सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत. तर मस्साजोगच्या गावकऱ्यांनी मंगळवारी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

    व्हिडीओ कॉलवर एकूण सहा लोक होते, जे संतोष देशमुख यांची हत्या लाईव्ह बघत होते, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आरोपी प्रतिक घुले याने हा व्हिडीओ कॉल केला होता. पण आरोपी प्रतिक घुले याने हा व्हिडीओ कॉल कोणत्याही व्यक्तीला केला नव्हता, तर त्याने हा व्हिडीओ कॉल व्हॉट्सअॅपवरील ‘मोकारपंती’ नावाच्या ग्रुपवर केला होता. या ग्रुपमधील सहाजण या व्हिडीओ कॉलवर लाईव्ह पाहत होते. या सहाजणांसमोर संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे व्हिडीओ कॉलवर असणारे सर्व सहाजण 17 ते 19 या वयोगटातील होते. आता हे सहाजण कोण होते आणि संतोष देशमुख यांना मारहाण होताना, या ग्रुपवर व्हिडीओ कॉल करण्याचं नेमकं कारण काय होतं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

   दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना दिली जात नाही. खंडणी प्रकरणी आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी केलं जात नाही. या प्रकरणातील इतर आरोपींना मोक्का लावण्यात आला. पण कराड यांना मोक्का लावण्यात येत नाही अशी तक्रार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला मोक्का लावा या मागणीसाठी गावकरी बुधवारी दिवशी सकाळी 10 वाजता सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत.

संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी टॉवरवर चढून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मस्साजोगचे गावकरी हे एकत्रित जमले आणि त्यांनी बुधवारी सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!