*लावण्याई पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी बनवलेल्मा घरगुती पदार्थांची पालकांनी घेतली लज्जत*
लावण्याई पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी बनवलेल्मा घरगुती पदार्थांची पालकांनी घेतली लज्जत
परळी (प्रतिनिधी)
लावण्याई पब्लिक स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थांनी बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांच्या चवीने उपस्थित पालक,नागरीकांच्या जिभेवर बालपणीच्या पदार्थांची चव दरवळली.शाळेच्या वतीने आयोजित आनंद नगरीस पालकांसह परिसरातील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
परळी शहरातील अंबेवेस भागात असलेल्या लावण्याई पब्लिक स्कूलच्या वतीने सोमवार दि.६ जानेवारी रोजी आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते.या आनंद नगरीत विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी बनवुन आणलेले वडापाव,भेळ, गुलाबजाम,ईडली,सॅन्डविच,मसाला राईस,पोहे,पाणीपुरी आदी पदार्थ ठेवले होते.या आनंद नगरीचे उद्घाटन नागोराव देशमुख,अनंत भातांगळे,अश्विन मोगरकर, धनंजय आढाव, अध्यक्ष अनंत कुलकर्णी,बाळु आर्वीकर आदींच्या करण्यात आल्यानंतर उपस्थित पालक,परिसरातील नागरिकांनी चिमुकल्यांच्या हातुन काका हे घ्या मी बनवले आहे अशा पदार्थांचा आस्वाद घेतला. हा आनंद नगरी च्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका कविता विधै शिंदे मॅडम लाड मॅडम गोजे मॅडम देशमुख मॅडम आदिनी परिश्रम घेतले
