ताज्या घडामोडी

*नगर परिषद पाठोपाठ आता सोमवार पासून सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण धारकावर चालवणार हातोडा*

नगर परिषद पाठोपाठ आता सोमवार पासून सार्वजनिक बांधकाम विभाग  शहरातील अतिक्रमण धारकावर चालवणार हातोडा

स्वतःचे नुकसान टाळण्या साठी अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे काढून घेण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवाहन  

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
     नगर परिषद पाठोपाठ आता सोमवार पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील अतिक्रमण धारकावर हतोडा मारणार असल्याने स्वतःचे नुकसान टाळण्या साठी अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
     केज मतदार संघाच्या आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्ना मधून अंबाजोगाई शहरातील रस्त्या साठी कोटयावधी रुपयांचा फंड उपलब्ध झाल्या मुळे शहरातील रस्ते चकाचक झाले आहेत, होत आहेत मात्र शहरातील अतिक्रमणाची समस्या काही सुटता सुटायला तयार नाही. अंबाजोगाई शहरातील नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारा एकही रस्ता असा नाही की ज्या रस्त्यावर अतिक्रमण नाही.
     अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी आय ए एस अर्पिता हुबे, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे सह सर्व न प च्या टीमने स्वतः रस्त्यावर उतरत मागील 2 दिवसा पासून नगर परिषदेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस स्टेशन समोरील व्यापारी संकुल या सह बस स्थानक ते पाटील चौक या रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा उगारताच अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन आपली अतिक्रमणे काढून घेतली, काही जण घेत आहेत.
      नगर परिषद हद्दी प्रमाणेच संत भगवान बाबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे सदर बाजार, दवाखाना, मोरेवाडी मार्गे यशवंतराव चव्हाण चौक, लातूर टी पॉईंट व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रमाबाई चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या प्रमुख रस्त्यावर नव्याने बांधलेल्या नाल्यावरील अतिक्रमणा सह रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आतिक्रमणे झाली असून रस्त्याच्या मध्या पासून दोन्ही बाजूची 50 फुटाच्या आतील सर्व अतिक्रमणे सोमवार पासून काढण्यात येणार आहेत.
     या मोहिमे साठी जिल्हा पोलिस प्रमुख नवनीत कावत यांनी 1 डी वाय एस पी, 2 पोलीस निरीक्षक, 40 पोलीस कर्मचारी, 20 महिला कर्मचारी, 2 डी सी एम वाहने, 2 आर सी पी प्लाटून एवढा पोलीस बंदोबस्त दिलेला असून ही मोहीम सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहे.
     या सर्व रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी (पक्की बांधकामे केलेल्या सह) आपले नुकसान टाळण्यासाठी आपाआपली अतिक्रमणे विना विलंब काढून घ्यावीत असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी, उपअभियंता गोविंद मुंडे, शाखा अभियंता गोविंद शेळके यांच्या सह पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांनी केले आहे.
*नुकसान टाळण्यासाठी फिरते पथक आवश्यक*
    आज पर्यतच्या अनुभवा नुसार आज अतिक्रमणे काढली की परत आठ दिवसात परस्थिती जैसे थे होते. पुन्हा ज्या वेळी ती काढली जातात त्या वेळी अतिक्रमण धारकांचे ही मोठया प्रमानावावर नुकसान होते. त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांनी ईतर शहरा प्रमाणे कायम स्वरूपी एक फिरते पथक निर्माण करावे अशी जनते मधून मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!