ताज्या घडामोडी

देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपीला मकोका वाल्मिक कराड यांना वगळल्याची माहिती

देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपीला मकोका वाल्मिक कराड यांना वगळल्याची माहिती

 

बीड (प्रतिनिधी)

   मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आसून या हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याची व यात वाल्मिक कराड यांचे नाव नसल्याची माहिती प्राप्त झाली

   मस्साजोग परिसरातील अवादा एनर्जी कंपनीकडे दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप आहे. या खंडणी प्रकरणातूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर 22 दिवसांनी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला होता. 31 डिसेंबर पासून वाल्मिक कराड कोठडीत आहे. मात्र अद्याप त्याच्यावर हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, त्यामुळे त्याला एसआयटीने मकोका लावला नसल्याची माहिती आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींना आज एसआयटीने मकोका लावला आहे. संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मकोका कायदा महाराष्ट्रात आणण्यात आला आहे. यामुळे तपास अधिकाऱ्यांना आता आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा वेळ मिळणार आहे. मकोका अंतर्गत आरोपींना जामीन मिळणे कठीण होणार असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

मृत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी मुख्यमंत्र्यांना खंडणीपासून अपहरण आणि हत्ये पर्यंचा सर्व घटनाक्रम त्यांना सांगितला होता. या प्रकणातील आरोपी आणि आरोपींना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी केली होती.

आमदार सुरेश धस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. विरोधकांनीही ही मागणी लावून धरली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहातच सर्व आरोपींवर मकोका लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हत्येचा सूत्रधार म्हटला जाणारा वाल्मिक कराड याला मकोकांतर्गच्या कारवाईतून वगळण्यात आले आहे.

1) सुदर्शन घुले, 2) प्रतिक घुले, 3) सुधीर सांगळे, 4) विष्णू चाटे, 5) महेश केदार, 6) सिद्धार्थ सोनवणे, 7) जयराम चाटे 8) कृष्ण आंधळे या आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. यातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे दोघेही खंडणी प्रकरणातील आरोपी होते. या दोघांवर हत्येचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र वाल्मिक कराडवर अजून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळेच त्याच्यावर मकोका लावण्यात आला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

खंडणी ते अपहरण आणि हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर 302 अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!