ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात, मल्टिस्टेटच्या फ़ंड्याने हजारो कटुंब झाले आहेत उध्वस्त
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात EDची मोठी कारवाई, सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात, मल्टिस्टेटच्या फ़ंड्याने हजारो कटुंब झाले आहेत उध्वस्त
बीड-
मराठवाड्यात लाखो ठेवीदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटवर ईडीने मोठी कारवाई केली आसून ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे ईडीने सुरेश कुटेची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान ज्ञानराधा मल्टी स्टेटच्या या जादा परताव्याचा फ़ंड्याने हजारो कटुंब उध्वस्त झाले आहेत.
बजप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 1433 कोटी 48 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असून सुरेश कुटे आणि त्याच्या पत्नी अर्चना कुटे यांनी मल्टीस्टेटच्या माध्यमातून 4 लाखांहून अधिक ठेवीदारांकडून जवळपास 2470 कोटी रुपये गोळा केले. ठेवीदारांना 12-14% व्याजदराचा परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या ठेवींचा अपहार करत कुटे ग्रुपच्या विविध कंपन्यांना फसव्या कर्जांच्या स्वरूपात रक्कम वाटप करण्यात आली.
कुटे ग्रुपने या रकमेचा गैरवापर केला आणि अनेक बँक खात्यांतून थेट पैसे काढून घेतल्याचं ईडीच्या तपासात समोर आले आहे . कुटे आणि कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला असून एमपीआयडी कायद्यांतर्गत मे ते जुलै 2024 दरम्यान विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. ठेवीदारांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतलेल्या या प्रकरणामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी ईडीचा तपास अद्याप सुरू आहे. ईडीने 9 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या पत्रकात या कारवाईची माहिती दिली. या प्रकरणावर पुढील कायदेशीर पाऊल कसे उचलले जाईल, याकडे ठेवीदारांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीच ED नेज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात बीड छत्रपती संभाजीनगर, मुंबई पुण्यातील शाखांमधून तब्बल 95 कोटींची संपत्ती जप्त केली होती.
राज्याबाहेरही जाळे असल्याची शक्यता
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेटचे राज्यात व राज्याबाहेर जाळे पसरलेले आहे. गेल्या वर्षभरापासून मल्टीस्टेट बंद असल्याने गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेले आहेत. या मल्टीस्टेट घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार सुरेश कुटे यांची मागील महिन्यात ईडी कडून कसून चौकशी करण्यात आल्यानंतर व केंद्र सरकारने दिलेल्या निर्णयानंतर बीड, छत्रपती संभाजी नगर पुणे व मुंबई या शाखांमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीकडून एकूण १०२ कोटींची मालमत्ता जप्त
ईडीकडून आत्तापर्यंत एकूण 102 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून या चारही शाखांमधून जवळपास 95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये या चारही शाखांमधील फ्लॅट, व्यावसायिक कार्यालय, प्लॉट अशी 85 कोटी 88 लाख रुपये किमतीची स्थावर मालमत्ता तसेच इतर मालमत्ता असे एकूण 95 कोटी एक लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संस्थापक सुरेश कुठे व इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.
