अलखैर पतसंस्थेच्या वाहन कर्जाचे सुदर्शन रापतवार यांच्या हस्ते वितरण
अलखैर पतसंस्थेच्या वाहन कर्जाचे सुदर्शन रापतवार यांच्या हस्ते वितरण
अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
अंबाजोगाई शहरात अल्पावधीतच आपल्या कार्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वाहन कर्ज उपक्रमांर्तगत घेतलेल्या गाडीचे वितरण ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
अंबाजोगाई शहरात मागील काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवत शहरातील मुस्लिम बांधवांसह आता हिंदु बांधवांनाही आपलेसे करुन घेतले आहे. सुरुवातीची काही वर्षे केवळ मुस्लिम समाज बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या अलखैर पतसंस्थेकडे मागील काही वर्षांपासून हिंदू समाज बांधव ही मोठ्या प्रमाणावर आकृष्ट झाला असून पतसंस्थेच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सरसावला आहे.
याचाच एक भाग म्हणून अंबाजोगाई शहराचे लोकप्रिय संवेदनशील लेखक तथा जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांच्या हस्ते पतसंस्थेच्या वाहन तारण मुराबा कर्ज योजने अंतर्गत देण्यात आलेले “अशोक लिलेंड
कंपनी चे ” दोस्त -एक्स एल” ची चावी “अशोक गणपतराव बलुतकर (बलुतकर डेकोरेटर्स )” यांना देण्यात आली. या प्रसंगी “चिल्लरगे डेकोरेटर्स चे मालक- महेश्वर चिल्लरगे अप्पा, अलखैर पतसंस्थेचे अध्यक्ष-शेख उमर फारूक सर व मॅनेजर-सय्यद रऊफ उपस्थित होते.
