मुख्य आरोपींना देशमुख यांचं लोकेशन सांगणारा सूर्याजी पिसाळ सिद्धार्थ आंदोलनात आणि अंत्ययात्रेत सहभागी
मुख्य आरोपींना देशमुख यांचं लोकेशन सांगणारा सूर्याजी पिसाळ सिद्धार्थ आंदोलनात आणि अंत्ययात्रेत सहभागी
बीड (प्रतिनिधी)
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे हा दुसरा तिसरा कोणी नसून मस्साजोग येथील रहिवासी असलेला सूर्याजी पिसाळ निघाल्याने व हाच हरामखोर संतोष हत्ये प्रकरणी प्रारंभीच्या काळात झालेल्या आंदोलनात सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणात तब्बल तीन आठवड्यांपासून फरार असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने शनिवारी सकाळी बेड्या ठोकल्या त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी या दोघा सोबत न्यायालयात हजर करण्यात आलेला तिसरा व्यक्ती होता सिद्धार्थ सोनवणे व या व्यक्तीला सी आय डी पथकाने कल्याण मधून ताब्यात घेतले होते, यावेळी न्यायालयाने तिघा आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिद्धार्थ सोनवणे कोण आणि याची या प्रकरणी भूमिका काय ?
संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर संतोषचे लोकेशन आरोपींपर्यंत कुणी पोचवले याचा शोध घेत असताना समोर आलेलं नाव होतं सिद्धार्थ सोनवणे मात्र पोलिसांनी हे नांव काल पर्यंत गुप्त ठेवलं होतं कारण हा पोलिसांच्या तपासाचा महत्वाचा भाग होता. सुदर्शन घुलेचा सहकारी मित्र सिद्धार्थ सोनवणे याने देशमुख यांचे लोकेशन आरोपी घुले आणि अन्य साथीदारांना दिल्याचे समोर आले आहे. हत्येच्या दिवशी केज शहरातून सरपंच संतोष देशमुख गावी निघाले असता सिद्धार्थ सोनवणे याने सुदर्शन घुले याला लोकेशन दिल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांच्या लोकेशन तपासाची भनक सोनवणेला लागताच त्याने आपला मोबाईल फोन बंद केला. पण कॉल रेकॉर्डचा इतिहास तपासून पोलिसांनी त्याचा माग घेतला. सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. अखेर पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली.
मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील रहिवासी असलेला सिद्धार्थ सोनवणे हा सुशिक्षित बेरोजगार. वय वर्षे अंदाजे 35. सिद्धार्थ सोनवणे याचा इतिहास गुंड प्रवृत्तीचा आसून त्याची आणि सुदर्शन घुलेची चांगली मैत्री होती आणि यातून सिद्धार्थ सोनवणे याने सूर्याजी पिसाळची भूमिका बजावत संतोष च्या मारेकऱ्याला सहकार्य केले.
देशमुख यांची अंत्ययात्रा व आंदोलनात सिद्धार्थचा सहभाग
देशमुख यांचे लोकेशन घुले आणि त्याच्या अन्य सहकाऱ्यांना दिल्यानंतर सोनवणे हत्येनंतर झालेल्या रास्ता रोको आणि अंत्यविधीच्या कार्यक्रमात देखील उपस्थित राहुन घर का भेदी लंका जालने वाला सिद्धार्थ पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही पोलिसांनी अखेर त्यालाही बेड्या ठोकल्याच.
