*खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांना केज न्यायालयाची 15 दिवसाची पोलीस कोठडी
*खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड यांना केज न्यायालयाची 15 दिवसाची पोलीस कोठडी
केज(प्रतिनिधी)
खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड यांनी आज पुणे येथे आत्मसमर्पण करण्यात आल्या नंतर थोड्या वेळा पूर्वी केज न्यायालयात हजर केल्या नंतर न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराड हे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात शरण आल्यानंतर त्याची जुजबी चौकशी करून विशेष पथक त्यांना बीडला घेऊन आले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात वाल्मिकवर आरोप झाल्याने वाल्मिक कराड फरार होते.
आज पहिल्यांदाच सीआयडीने वाल्मिक कराड यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांच्या हाताला काय लागले याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.
वाल्मिक कराड यांच्या नावावर पवनचक्की प्रकरणातल्या खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद आहे. त्याचवेळी त्यांच्यावर देशमुख हत्या प्रकरणाचेही थेट आरोप होत आहेत. या सगळ्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने पथक कराड यांच्या मागावर होते. अखेर वाल्मिक कराड आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अतिशय नाट्यमयरित्या गुन्हे अन्वेषण विभागाला शरण आले. दुपारी १ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत त्याची जुजबी चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी सीआयडीच्या पथकासह त्यांना बीडच्या दिशेने रवाना करण्यात आले.
कराड यांची CID कडून जुजबी चौकशी, डीआयजींनी स्वत: सांगितले
याविषयी अधिक माहिती देताना डीआयजी सारंग आवाड म्हणाले, आज दुपारी केज पोलिस स्टेशनमधला फरार आरोपी वाल्मिक कराड स्वत:हून सीआयडी मुख्यालयात हजर झाल्या नंतर त्यांना सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतले आहे. जुजबी चौकशी करून आमच्या टीमसह तपासी अंमलदार बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरिता रवाना केले आहे.
कराड समर्थक रस्त्यावर, केज शहराला छावणीचे स्वरूप
वाल्मिक कराड यांना केज मध्ये घेऊन येत असल्याचे समजताच त्यांच्या असंख्य समर्थकांनी पोलीस स्टेशन व कोर्ट परिसरात एकच गर्दी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमानावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला त्या नंतर पोलिसांनी जमाव पिटाळून लावल्याचे समजते.
*वाल्मिक कराड केज न्यायालयात हजर*
वाल्मिक कराड यांना केजच्या न्यायालयात हजर करण्या संदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला विनंती केल्या नंतर ती विनंती मान्य करण्यात आली व त्या नुसार थोड्याच वेळा पूर्वी त्यांना सर्व प्रथम केज पोलीस स्टेशन ला आणण्यात आले. त्या नंतर केज उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या नंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी झालेल्या सुनावणी नंतर न्यायालयाने त्यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या वेळी कराड यांच्या वतीने ऍड अशोक कवडे तर विशेष सरकारी वकील म्हणून एस देशपांडे यांच्या ऐवजी एनवेळी ऍड जे बी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी काम पाहिले.
