वाल्मीक कराड यांनी पुणे येथे सीआयडी ऑफिसमध्ये केले आत्मसमर्पण, आज केज येथे आणले जाण्याची शक्यता
वाल्मीक कराड यांनी पुणे येथे सीआयडी ऑफिसमध्ये केले आत्मसमर्पण, आज केज येथे आणले जाण्याची शक्यता
पुणे (प्रतिनिधी)
बीडमधील खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड यांनी आज पुणे येथे सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर केले असून सी आय डी चे पथक आज कराड यांना केज येथे घेऊन येण्याची शक्यता आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यस्था राज्यात चर्चेचा विषय झाली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव समोर आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर तपासाला वेग आला. त्यांनी वाल्मीक कराड याच्या निकटवर्ती लोकांची कसून चौकशी केली. त्याशिवाय पासपोर्ट रद्द करण्याची सरकारकडे मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर वाल्मीक कराड यांची सर्व बँक खाती फ्रीज करण्यात आली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार आहे. आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव आहे. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीच्या 9 पथका कडून घेतला जात होता.
वाल्मीक कराडचे अनेक कार्यकर्ते सीआयडीच्या कार्यालयाबाहेर दाखल झाले आहेत. आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. वाल्मीक कराड हे आरोपी नाहीत. ते खंडणीचा त्यांच्यावर खोटा आरोप, गुन्हा दाखल केला असल्याचे समर्थकांचे म्हणणं आहे. बीड आणि अहमदनगरवरून आलेल्या समर्थकांनी सीआयडी कार्यालयाबाहेर गर्दी केली. पुण्यातून चार सीआयडीची विशेष पथके वाल्मीक कराडच्या शोधासाठी रवाना झाले होते. पुण्यातून पहाटे २ तर सकाळी १ पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झाले होते. वाल्मीक कराड यांनी थोडाच वेळा पूर्वी स्वतःहाला पुणे येथील पाषाण रोडवर असलेल्या सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले असून सीआयडीकडून तपास आणि शोध सुरूच ठेवला जाणार आहे.
आत्मसमर्पण करण्या पूर्वी काय म्हणाले वाल्मिक कराड?
“मला अटकपूर्व जामीनचा अधिकार असताना मी पुण्यात सीआयडीकडे शरण येतो आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. केवळ राजकीय हेतून याप्रकरणात माझं नाव घेतलं जात आहे. जर या प्रकरणात मी दोषी आढळलो तर कायद्याने मला जी शिक्षा होईल, ती भोगायला तयार आहे”, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी स्वतः व्हिडीओ जारी केला आहे.