ताज्या घडामोडी

 *”रेशीमगाठी विवाह संस्थेने” मागील 8 वर्षांत मेळाव्यांच्या माध्यमातून जुळविले शेकडो विवाह– भारतकाका पतंगे*

 “रेशीमगाठी विवाह संस्थेने” मागील 8 वर्षांत मेळाव्यांच्या माध्यमातून जुळविले शेकडो विवाह– भारतकाका पतंगे

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)

   रेशीमगाठी विवाह संस्थेने” मागील 8 वर्षांत मेळाव्यांच्या माध्यमातून शेकडो विवाह जुळवले असून मध्यस्थ अनोळखी व्यक्तींकडून विवाह जुळविताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन भारतकाका पतंगे यांनी केले आहे.
    धकाधकीच्या आयुष्यात एकिकडे कुटुंबात परस्परातील संवाद, जिव्हाळा कमी झाला आहे. तर दुसरीकडे मात्र आजच्या काळात रेशीमगाठी सकल मराठा विवाह संस्था ही समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज संस्थेचे अध्यक्ष तथा रेशीमगाठी सकल मराठा विवाह केंद्राचे संचालक भरतकाका पतंगे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही रेशीमगाठी सकल मराठा विवाह केंद्राच्या माध्यमातून मागील 7 ते 8 वर्षांत वधू-वर पालक परिचय मेळावे घेतले. या मेळाव्यांच्या माध्यमातून शेकडो नविन नाती जोडून लग्न जुळविण्याचे काम केले. हे सर्व या विवाह संस्थेच्या माध्यमातून व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासामुळे शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!