संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांचे सी आय डी ला आदेश
संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांचे सी आय डी ला आदेश
*हातात बंदुका घेऊन फोटो काढणाऱ्यावर ही होणार कार्यवाही*
मुबंई:- (प्रतिनिधी )
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलत एस आय टी चौकशी सह न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी विधानसभेत घोषणा केल्या नंतर आज फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सी आय डी ला दिले आहेत.
संतोष देशमुख हत्ये नंतर आ. जितेंद्र आव्हाड, आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ नमिता मुंदडा, आ विजयसिंह पंडित यांच्या विधान सभेतील सभागृहा मधील भावनिक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या भाषणा मुळे सर्वच सदस्यांचे व ही भाषणे पाहून सर्वच दर्शकांचे डोळे पानावत होते. आरोपीस याच पध्दतीने शासन व्हावे अशी सर्वांची ईच्छा आहे. संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर शवविच्छेदन अहवाल समोर आला आसून यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणात विष्णू चाटे याच्यासह चौघांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत.
विधान सभेत मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडत असताना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली. येथील संघटित गुन्हेगारावर मोक्का अंतर्गत कार्यवाही केली जाईल अशी घोषणा केली. संतोष देशमुख हत्या होण्या पूर्वी खंडणीच्या विषया हुन जो राडा झाला यात वाल्मिक कराड यांचा रोल असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासात जेजे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही होईल त्या साठी एस आय टी सोबत न्यायालयीन चौकशी केली जाईल अशी घोषणा ही या वेळी त्यांनी केली आसून सध्या या हत्येच्या तपासाची सूत्रे सी आय डी ने हाती घेतली आहेत.
फरार आरोपीला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणी साठी आज सर्व पक्ष संघटनाच्या वतीने बीड शहरात न भूतो न भविष्य ते असा मोर्चा काढल्या नंतर सरकारचे धाबे दणाणले आसून मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी आज एक पाऊल पूढे टाकत फरार आरोपीची संपत्ती जप्त करण्याचे व हातात बंदुका घेऊन फोटो काढणाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आदेश सी आय डी ला दिले आसून आता तरी आरोपी पोलिसांना शरण येतात का ते पहावे लागणार आहे.
