संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन करणारे सिव्हिल सर्जन म्हणतायत “इतकी वाईट केस या पूर्वी कधीच बघितली नव्हती” हे उदगार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांचे.
संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन करणारे सिव्हिल सर्जन म्हणतायत “इतकी वाईट केस या पूर्वी कधीच बघितली नव्हती”
हे उदगार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांचे.
बारामती(प्रतिनिधी)
संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदना विषयी बोलताना सिव्हिल सर्जन म्हणाले पोस्टमार्टेम करताना इतकी वाईट केस या पूर्वी कधीच बघितली नाही हे उदगार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांचे.
बारामती येथील एका कार्यक्रम प्रसंगी बोलताना मा ना अजित दादा पवार यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येची क्रुरते बद्दल सांगत या प्रकरणी सखोल चौकशी करून जो कोणी या घटनेचा मास्टर माईंड आहे त्याला आम्ही सोडणार नाहीत याचा पुनरुच्चार केला.
या वेळी बोलताना मा ना अजित पवार म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाची क्रुरतेने हत्या करण्यात आली. तिथे मी त्यांच्या मुलीला, पत्नीला आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी मी गेलो होतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत भाष्य केलं. काहीही झालं तरी या मागे जो मास्टरमाईंड असेल त्याला सोडलं जाणार नाही. कुठल्याही गोष्टी आपण खपवून घेणार नाही. कोणाला भयभीतपणे जगतोय असं कोणलाही वाटता कामा नये. माझ्या सह मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे असे आम्ही तिघांनीही या प्रकरणी लक्ष घातलेलं आसून मी बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात सिव्हिल सर्जनशी बोललो. ते म्हणाले पोस्टमार्टेम करताना इतकी वाईट केस या पूर्वी कधीच बघितली नाही..एखाद्या प्राण्याला मारताना देखील आपण विचार करतो. परंतु अमानुषपणे तिथे गोष्टी घडलेल्या आहेत. या शिव-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अशा घटनेमुळे शरमेन मान खाली जाते”. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून जो कोणी या घटनेचा मास्टर माईंड आहे त्याला आम्ही सोडणार नाहीत याचा पुनरुच्चार या वेळी त्यांनी केला.
Post Views: 291