ताज्या घडामोडी

२ रे अखिल भारतीय मराठी एल्गार गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी दगडू लोमटे*

२ रे अखिल भारतीय मराठी एल्गार गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी दगडू लोमटे

१ व २ फेब्रुवारी रोजी अंबाजोगाईत होणार मराठी गझल संमेलन

अंबाजोगाई :- दुसरे अखिल भारतीय मराठी एल्गार गझल संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी येथील प्रसिद्ध साहित्यिक दगडू लोमटे यांची निवड करण्यात आली आहे. अंबाजोगाई येथे हे दुसरे अखिल भारतीय मराठी एल्गार गझल संमेलन दि.१ व २ फेब्रुवारी रोजी योगेश्‍वरी महाविद्यालयाच्या नागापुरकर सभागृहात होणार आहे. महाराष्ट्र भरातून तीनशे गझलकार या गझल संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत.
अंबाजोगाई येथील साधना सेवाभावी संस्था यांच्या वतीने अंबाजोगाईत दि. १ व २ फेब्रुवारी रोजी दुसरे अखिल भारतीय मराठी एल्गार गझल संमेलन होणार आहे. या निमित्ताने झालेल्या बैठकीत स्वागत समितीची निवड करण्यात आली. यात स्वागताध्यक्ष म्हणून दगडू लोमटे, कार्याध्यक्ष डॉ.शुभदा लोहिया (राठी), उपाध्यक्ष निशा चौसाळकर, प्रा.मुकुंद राजपंखे, प्रा.शैलजा बरूरे, विद्याधर पांडे, शशिकला घोडके, सचिव गोरख शेंद्रे, सहसचिव दिवाकर जोशी, डॉ.राहुल धाकडे, कोषाध्यक्ष सुनिल जाधव तर स्वागत समिती सदस्य म्हणून कमलाकरराव चौसाळकर, अ‍ॅड.अनंतराव जगतकर, अनिकेत लोहिया, डॉ.नरेंद्र काळे, राजपाल लोमटे, बिपिन क्षीरसागर, महेश लोमटे, कल्याण काळे, डॉ.नवनाथ घुगे, लक्ष्मण टाक, एस.बी.सय्यद, संजय सुराणा, अ‍ॅड.जयंत भारजकर, अविनाश मुडेगावकर, खाजाभाई यांची स्वागत समितीवर निवड करण्यात आली आहे.
यापुर्वीचे पहिले गझल संमेलन अमळनेर येथे सन २०२३ साली झाले होते. या संमेलनात दुसरे अखिल भारतीय मराठी एल्गार गझल संमेलन अंबाजोगाईत घेण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या घोषणेनूसार साधना सेवाभावी संस्थेने या गझल संमेलनाचे पालकत्व स्विकारले. व अंबाजोगाईकरांच्या वतीने हे गझल संमेलन होणार आहे.
सन १९८३ साली अंबाजोगाईत झालेल्या ५७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या गझल सादरीकरणाचा पहिला अभिनव उपक्रम अंबाजोगाईतच झाला होता. अंबाजोगाईच्या साहित्य संमेलनात प्रथमच गझलेला अंबाजोगाईकरांनी बहुमान मिळवून दिला होता. त्याच धर्तीवर आता हे गझल संमेलन अंबाजोगाईत आद्यकवींच्या भूमित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!