लोखंडीसावरगावच्या रुग्णालयास मशिनरी खरेदीसाठी ४१ लाख ९२ हजारांचा निधी मंजूर
लोखंडीसावरगावच्या रुग्णालयास मशिनरी खरेदीसाठी ४१ लाख ९२ हजारांचा निधी मंजूर
आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
अंबाजोगाई -: अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडीसावरगाव येथील वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रास नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी मशिनरी खरेदीसाठी ४१ लाख ९२ हजारांचा निधी मंजूर आरोग्य विभागाच्या वतीने मंजूर झाला आहे. ही नवीन मशिनरी उपलब्ध झाल्यास रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया होण्यास गती मिळणार आहे. केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडीसावरगाव) येथे आरोग्य विभागाचे मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र व महिला रुग्णालय व सर्व रोग निदान व उपचार केंद्र कार्यरत आहे. यात जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्राच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांना सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जेष्ठ नागरिकांची महत्वाची समस्या असलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने या शस्त्रक्रिया रखडल्या होत्या. याबाबत आ. नमिता मुंदडा यांनी राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे निधी मंजूर होण्यासाठी मोठी मदत झाली. यामुळे आता नेत्र शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.व व ही नवीन यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी ४१ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता रुग्णालय प्रशासन शासनाच्या निर्देशनुसार ही यंत्र सामुग्री खरेदी करणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आ.नमिता मुंदडा यांनी मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री
मा एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री
मा अजितदादा पवार,मंत्री
मा आ पंकजाताई मुंडे
याचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्री असताना स्व.डॉ. विमलताई मुंदडा यांनी लोखंडी सावरगाव येथे हे रुग्णालय उभे केले होते. त्यामुळे कोरोना काळात ही रुग्णालयाची इमारत अनेकांना जीवदान देणारी ठरली. आता या इमारतीत रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभाग कार्यान्वित झाले आहेत. या माध्यमातून या रुग्णालयात रुग्णसेवा गतिमान होऊ लागली आहे.
