ताज्या घडामोडी

संतोष देशमुख हत्याप्रकरण; आरोपीचा एन्काऊंटर करणाऱ्याला माढ्याच्या शेतकऱ्या कडून 51 लाखांचे बक्षीस व 5 एकर जमीन देण्याची घोषणा 

संतोष देशमुख हत्याप्रकरण; आरोपीचा एन्काऊंटर करणाऱ्याला माढ्याच्या शेतकऱ्या कडून 51 लाखांचे बक्षीस व 5 एकर जमीन देण्याची घोषणा 

सोलापूर (प्रतिनिधी)

  संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक दिवस उलटले तरीही पोलिस मुख्य आरोपीला अटक करू न शकल्याने सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी पोलिसांना प्रोत्साहन मिळावे या उद्देश समोर ठेऊन आरोपीचे एन्काऊंटर करणाऱ्याला 51 लाख रु बक्षीस व 5 एकर जमीन देण्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.

    पूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनेक दिवस उलटले असले तरी हे प्रकरण अद्याप तापलेलंच आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे.

माढ्याच्या शेतकरी कल्याण बाबर यांच्या घोषणेने एकच खळबळ

संतोष देशमुख यांच्या हत्येला 10 दिवस उलटून गेले तरी याप्रकरणातील मुख्य आरोपींना अद्याप अटक नाही. या मुद्यावरून फक्त बीडमध्ये नव्हे तर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. पवनचक्कीत 2 कोटींच्या खंडणीच्या प्रकरणात सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केला. यामुळे राक्षसी कृत्याप्रमाणे संतोष देशमुखांचा जीव घेतला गेला असा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी सध्या आरोप-प्रत्यारोपांचेच राजकारण सुरू असताना सामान्य लोक मात्र न्यायाची मागणी करताना दिसत आहेत.

याचदरम्यान आता माढ्याच्या एका शेतकऱ्याने अनोख घोषणा केली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास लवकरात लवकर अटक करेल, त्या अधिकाऱ्या 2 लाख रुपये रोख देण्यात येतील. तर मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करेल अथवा त्याला फाशीपर्यंत पोहोचवेल , अशा पोलिस अधिकाऱ्यास 52 लाख रुपये, त्याशिवाय 5 एकर बागायत जमीन देण्याची अनोखी घोषणा माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर यांनी केली. ते माढा तालुक्यातील वडशिंगे येथील राहणारे असून त्यांनी अशा आशयाचे लिहीलेले प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह पोलिस महासंचालक आदींना शेतकरी बाबर यांनी पाठवले आहे. मात्र यामुळे एकच खळबळ माजली आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, तो सत्ताधाऱ्यांचा असो की विरोधकांचा. गुन्हेगाराची दहशत संपली पाहिजे, त्यांना कुठेतरी आळा बसला पाहिजे, सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना बाबर यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!