*बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे यांना अटक*
*बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याना अटक
केज-: सध्या सगळ्या राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय गाजत आहे. काल सभागृहात सुद्धा हा विषय झाला. संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट आहे. आरोपी विष्णू चाटेला पोलिसांनी पकडलं आहे. या हत्या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता चार वर गेली आहे. विष्णू चाटे हा हत्या आणि खंडणी मधील आरोपी आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांची गाडी अडवली. सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केलं. त्यांना बेदम मारहाण करुन नंतर त्यांची हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, आता चौथ्या आरोपीला अटक करण्यात आले आहे.
