*सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी व वाल्मिक कराड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*
*सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी व वाल्मिक कराड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मस्साजोग येथील सरपंच संतोष (अण्णा )देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी व वाल्मिक कराड यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण पणे करण्यात आलेल्या हत्येला आज 9 दिवस पूर्ण झालेले असताना यातील प्रमुख आरोपी सह तीन आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.राज्यभर या घटने विषयी तीव्र संताप व्यक्त होत असून विधानसभा हिवाळी अधिवेशनात ही विरोधी पक्षाच्या वतीने सरकारला धारेवर धरल्या गेले आहे.
या प्रकरणी एस आय टी स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभे मध्ये केली असून ज्या पवनचक्की प्रकल्पा वरून हे हत्याकांड घडले त्या पवनचक्की प्रकल्पाचे मॅनेजर शिंदे यांनी मा ना धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक यांच्या सह तीन जनावर केज पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान वाल्मिक कराड यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे असा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दावा असून हा गुन्हा मागे घ्यावा या साठी बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात अजित पवार गटाचे कार्यकर्ते निवेदन देण्यासह आंदोलन करत आहेत.
आज अंबाजोगाई मधेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांना निवेदन दिले. या वेळी आबासाहेब पांडे, अजितदादा गरड, बळवंत बावनी, अजितदादा देशमुख, शरद शिंदे, प्रवीण जगताप, मनोज गंगणे, अमोल गंगणे, विलास बापू मोरे, सतीश शिरसाठ, बालाप्रसाद बजाज, ताराचंद शिंदे, हाजी शेख वहीत पठाण, रावसाहेब आडे, गुणवंत आगळे, गणेश भगत, विठ्ठल हरकळ, वसंत गोरे, महादेव वाघमारे, राजाभाऊ शेप, बालासाहेब शेप, लक्ष्मण करणर, सुधाकर शिंनगारे श्याम लोव्हारे, बबन मुंडे, विशाल माने, प्रशांत दहिफळे, महादेव वाकडे गौतम बापू चाटे, बंडू शिंदे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
