अंबाजोगाई शहर पोलीस निरीक्षकास सर्वच प्रकारचा ताण असताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मात्र “भोपळ्यात बी खुशाल”
अंबाजोगाई शहर पोलीस निरीक्षकास सर्वच प्रकारचा ताण असताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मात्र “भोपळ्यात बी खुशाल”
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एकीकडे अंबाजोगाई शहरात असलेल्या दोन पोलीस स्टेशन पैकी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकास सर्वच प्रकारच्या ताण तणावाला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण पोलीस हद्दीत सर्व काही धंदे आलबेल चालू ठेऊन या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे भोपळ्यात बी खुशाल आहेत.
अंबाजोगाई शहर व ग्रामीण हद्दी मधील कायदा व सुव्यवस्था संभाळण्या साठी शहर व ग्रामीण असे दोन स्वतंत्र पोलीस स्टेशन असून शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकास सर्वच प्रकारच्या ताण तणावाला सामोरे जावे लागते. शहर पोलिसा समोर ताण तणाव येण्याचं प्रमुख कारण म्हणजे अपुरे मनुष्य बळ. लोकसंख्येच्या मानाने अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग त्यात महिला कर्मचार्यांची संख्या अधिक त्यामुळे काम देतेवेळी अधिकाऱ्यांना अनंत अडचणी येतात. शहर पोलिसांना केवळ शहरात काहीही घडामोड होऊ द्या माहिती मिळताच घटनास्थळी धाव घ्यावी लागते असे नाही तर स्वा रा ती रुग्णालयात एम एल सी च्या माध्यमातून येणाऱ्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचा परस्थिती नुसार बंदोबस्त करावा लागतो, शहरात वेळोवेळी निघणारे मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलने याला बंदोबस्त देऊन सामोरे जावे लागते. शहरात वारंवार अनेक मंत्री, संत्री येतात, राजकीय बडे नेते येतात त्यांच्या बंदोबस्ता साठी धाव घ्यावी लागते. शहरात योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या व्ही आय पी लोकांना केवळ बंदोबस्तच करावा लागतो असे नाही तर या व्ही आय पी लोकांना सर्व सुविधा पुरवण्या पर्यंत लवाजमा करावा लागतो. शहरात वाहतूक समस्या हा तर दैनंदिन विषय असतो या समस्येला सामोरे जाण्यासाठी वाहतूक पोलिसा व्यतिरिक्त अन्य पोलीस बांधवानाही सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील असंख्य महाभाग शहरात येतात आणि नको ते उद्योग या ठिकाणी करतात पर्यायाने कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होतो आणि पोलिसांना धाव घ्यावी लागते, न्यायालयीन प्रक्रिये मुळे मेहरबान न्यायालयाचा आदेश आला की पोलिसांना तात्काळ धाव घ्यावी लागते. या सह अनेक प्रकाराच्या माध्यमातून शहर पोलीस आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या शहर पोलीस निरीक्षकावर कमालीचा ताण तणाव असतो हे मात्र स्पष्ट दिसते.
दुसरी कडे मात्र अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मात्र भोपळ्यात बी खुशाल आहेत हे मात्र निश्चित. यांना ना कोणत्या मोर्चाला सामोरे जावे लागते ना आंदोलनाला, यांना ना न्यायालयाचा तणाव आहे ना रुग्णालयाचा तणाव आहे. कधी तरी घडणारा एखादा गंभीर गुन्हा वगळता गुन्ह्याचे प्रमाण अत्यल्प असते. परवाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील घाटनांदूर येथे ईव्हीएम मशीनची तोडफोड झाली आणि या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकास दिल्या गेल्याची खात्रीलायक माहिती आहे मग वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ग्रामीण पोलीस निरीक्षकावर विश्वास नाही की अन्य काही विषय आहे हे ही समजलं
एकूणच या ग्रामीण पोलीस निरीक्षक महोदयांना कसलाही ताण तणाव दिसून येत नाही व त्यामुळे ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सर्व काही अवैध धंदे जोमाने सुरू आहेत. मटका आणि गुटख्याने तर कहरच केला आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी मधील हे सर्व अवैध धंदे कोणाच्या कृपा आशीर्वादाने सुरू आहेत हे न समजण्या एवढे दुध खुळे सुजाण नागरिक नाहींत. आणि सर्व काही आलबेल सुरू असताना सतत रडणारे हे महोदय चक्क म्हणतात “इथं काहीच नाही हो, उगीच वरून टाकलं म्हणून ड्युटी करत आहे. मी तर बदली कधी होते याची वाट पाहतोय” त्यांच्या तोंडून वारंवार निघणारे हे वक्तव्य म्हणजे नैराश्य दाखवणारे असले तरी हे नैराश्य “नौ सो चुहे खाकर बिल्ली हज को चली” असे असुन पोलीस स्टेशन हद्दीत सर्व अवैध धंदे आलबेल चालू ठेऊन हे पोलीस निरीक्षक मात्र “भोपळ्यात बी खुशाल” आहेत हे सत्य नाकारून चालत नाही.
