*क्रांतीची बिजे ही साहित्यातूनच पुढे येतात – डॉ.शिरीष खेडगीकर*
*क्रांतीची बिजे ही साहित्यातूनच पुढे येतात – डॉ.शिरीष खेडगीकर*
*11 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन*
अंबाजोगाई – क्रांतीची बिजे ही साहित्यातूनच पुढे येत असतात. मग ती क्रांती वैचारिक असो की, साहित्यीक असो. विचाराला सकस लेखनाची जोड मिळाल्यानंतरच ही क्रांतीची बिजे स्पुलींग रूप धारण करतात. असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ साहित्यीक तथा दंत चिकित्सक डॉ.शिरीष खेडगीकर यांनी केले.
दि.14 व 15 डिसेंबर रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात होत असलेल्या 11 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ.शिरीष खेडगीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसापचे अध्यक्ष दगडु लोमटे, ज्येष्ठ साहित्यीक अमर हबीब, सचिव गोरख शेंद्रे , डॉ.कमलाकर कांबळे, प्रा.डॉ.शैलजा बरूरे, प्रा.देविदास खोडेवाड, डॉ.राहुल धाकडे, रेखा देशमुख, तिलोतमा पतकराव, स्वागत समितीचे सचिव प्रा.पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ.खेडगीकर म्हणाले की, मराठी भाषेचा र्हास सुरू असताना अशी गावची संमेलने दिशादर्शक ठरतात. एकीकडे मराठी शाळांची होत असलेली दुरावस्था मराठी भाषेविषयी असाणारी उदासिनता अशा भिषण परिस्थितीत निश्चितच हे गावचे संमेलन नवा मार्ग दाखविल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकाश्रयातून होणारं गावचं संमेलन ही वेगळी ओळख अंबाजोगाईकरांनी जपल्याचे त्यांनी सांगितले. हे संमेलन ईव्हेंट नव्हे तर मुमुेंन्ट आहे. ही चळवळ आगामी काळात समाजजागृतीचा जागर निर्माण करणारी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना बालाजी सुतार म्हणाले की, चांगल्या वाचकातूनच लेखकाचा जन्म होत असतो. परिसर सभोवताल यांच्या व्यथा साहित्यातून मांडण्यासाठी लेखकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. साहित्याला बळ देणारी ही संमेलने अखंडीत राहिली तर समाजाला नवी दिशा मिळेल. असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संमेलनाच्या निमित्ताने दिला जाणारा डॉ.शैला लोहिया लेखिका पुरस्कार रचना यांना, मंदाताई देशमुख कथा लेखन पुरस्कार उमेश मोहिते यांना, प्राचार्य संतोष मुळावकर शिक्षक लेखक पुरस्कार अलिम अजिम यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्रारंभी संमेलनाची सुत्रे दिपप्रज्वलन करून हस्तांतरीत करण्यात आली. मसापचे अध्यक्ष दगडू लोमटे यांनी प्रज्वलीत केलेली मनबत्ती संमेलनाध्यक्ष बालाजी सुतार यांच्याकडून सोपवून संमेलनाचे सुत्रहस्तांतरण केले. यावेळी स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संमेलनाची भूमिका विषय केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत जोंधळे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गोरख शेंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*साहित्य संमेलनानिमित्त निघालेल्या जागर दिंडीतून झाला ज्येष्ठांचा सन्मान*
अंबाजोगाई – शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित असलेल्या ज्येष्ठांना गुलाब पुष्प देवून स्वागत केले व ज्येष्ठांचा सन्मान केला. हा अनोखा उपक्रम 11 व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या जागर दिंडीतून समाजाला दिशा देणारा ठरला.
11 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शनिवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जागर दिंडी मुकुंदराज सभागृहाकडे निघाली.
या जागर दिंडीचे उद्घाटन पुर्वस्वागताध्यक्ष डॉ.बी.आय.खडकभावी यांच्या उपस्थितीत झाले. या जागर दिंडीत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही जागर दिंडी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावरकर चौक मार्गे सभागृहात पोहोंचली. सभागृहात शालेय विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांनी गुलाब पुष्प देवून त्यांचा सन्मान केला. तर ज्येष्ठांनीही विद्यार्थ्यांना ग्रंथ भेट देवून वाचन चळवळ रूजविली. या ग्रंथ दिंडीत घोडेस्वार विद्यार्थी, लेझीम पथक, गोंधळी, झांझपथक यांचा सहभाग होता. या जागर दिंडीत संमेलनाचे अध्यक्ष बालाजी सुतार, संमेलनाचे उद्घाटक डॉ.शिरीष खेडगीकर, स्वागताध्यक्ष सुदर्शन रापतवार, मसापचे अध्यक्ष दगडु लोमटे, सचिव गोरख शेंद्रे, कार्यकारीणी सदस्य प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे प्रा.डॉ.शैलजा बरूरे, प्रा.देविदास खोडेवाड, डॉ.राहुल धाकडे, रेखा देशमुख, तीलोतमा पतकराव, निशा चौसाळकर, प्रा.विष्णु कावळे, स्वागत समितीचे सचिव प्रा.पंडीत कराड, उपाध्यक्ष सुभाष बाहेती, सदस्य वंदना तेलंग, विजय रापतवार, विष्णु सरवदे, सुजाता भोजने, सुनिल व्यवहारे, अश्रफ पठाण, दत्तात्रय आंबेकर, चंद्रकला देशमुख, विशाल जगताप, डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, एस.बी.सय्यद, मुजीब काझी, पद्माकर सेलमुकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत होते.
