ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कडक पावले उचलल्या मुळे परभणी शहर शांत 

नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी कडक पावले उचलल्या मुळे परभणी शहर शांत 

आता पर्यंत 50 हुन अधिक व्यक्तींना ताब्यात घेत शहाजी उमाप यांनी स्वतः  तळ ठोकून कायदा काय असतो हे परभणी कराना दाखवून दिले

परभणी :-(प्रतिनिधी)
    नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परभणी येथील परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलल्या मुळे शहर शांत झाले असून जमाव बंदी आदेश लागू करून दंगल खोरावर कार्यवाह्या करणे सुरूच आहे. दरम्यान आता पर्यंत 50 हुन अधिक व्यक्तींना ताब्यात घेतले असून शहाजी उमाप यांनी स्वतः परभणी येथे तळ ठोकून कायदा काय असतो हे परभणी कराना दाखवून दिले आहे.
     परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाज कंटकांने दोन दिवसा पूर्वी विटंबना केल्या नंतर या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले या घटनेच्या निषेधार्थ परभणी येथे पर्वा दिवशीच रास्ता रोको, रेल रोको व किरकोळ दगडफेकीचे प्रकार घडले होते. काल पुन्हा परभणी बंदची हाक देण्यात आली होती. शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी निघालेल्या डॉ आंबेडकर अनुयायी  महिला व पुरुष यांनी रस्त्या मधेच  दुकानावर दगडफेक, वाहनावर दगडफेक व जाळपोळ सुरू केली. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. या वेळी पोलिसांनी जमावास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव एवढा संतप्त होता की, जमावाने पोलिसांवर ही दगडफेक सुरू केली, पोलीस व्हॅनवर दगडफेक करण्यात आली.
    जमाव एवढ्यावर ही थांबला नाही त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आतील फर्निचरची मोडतोड केली. जिल्हाधिकारी महोदयांच्या टेबल वरील फाईल आणि महत्वाची कागदपत्रे फेकून दिले.
    शहाजी उमाप यांनी कठोर पावले उचललताच जमावाला पळता भुई थोडी
   घटनेचे गांभीर्य व परस्थिती ओळखुन नांदेड परिक्षेत्राचे कर्तव्यदक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तात्काळ परभणी गाठली आणि येथील परस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते स्वतः रस्त्यावर उतरले आणि पोलीस यंत्रणेला सक्त आदेश करत कडक पावले उचलली त्यामुळे पोलिसांनी ही सर्व प्रथम लाठीचार्ज आणि त्या नंतर अश्रूधुरांचा वापर करून जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केला. नंतर जमावालाही चांगला चोप देऊन पळवून लावल्याने परस्थिती ताबडतोब नियंत्रणात आली.
   परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या आदेशा नुसार शहरात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले
असून दंगल खोरावर कार्यवाह्या करणे सुरूच आहे. दरम्यान आता पर्यंत 50 हुन अधिक व्यक्तींना ताब्यात घेतले असून शहाजी उमाप यांनी स्वतः परभणी येथे तळ ठोकून कायदा काय असतो हे परभणी कराना दाखवून दिले आहे
कायदा हातात घेणाऱ्यावर कठोर कार्यवाही – उमाप
   या वेळी झुंजार न्यूज शी बोलताना शहाजी उमाप म्हणाले की, सविंधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना ही अत्यंत निंदनिय असून ही
विटंबना करणाऱ्याला जमावाने त्याच वेळी ताब्यात घेऊन चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र आसे असतानाही जमावाने परभणी शहरात जो अतिरेक केला, शहरात दहशत निर्माण केली आणि सामान्य जनतेस वेठीस धरले हे करणे योग्य नव्हते. काल दुपार पासून सर्वत्र शांतता असून आता पर्यंत 50 हून अधिक व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कार्यवाही सुरू आहे. या पुढे कायदा हातात घेणारांची कुठल्याही प्रकारे गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल असा इशारा शहाजी उमाप यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!