*भाजी मंडई येथील महात्मा फुले यांच्या नावाची कमान पूर्ववत लावण्याची महात्मा फुले सेवा संघाची मागणी*
*भाजी मंडई येथील महात्मा फुले यांच्या नावाची कमान पूर्ववत लावण्याची महात्मा फुले सेवा संघाची मागणी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील अतिशय जुनी अशी महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई ही सर्वदूर परिचित आहे. त्या भाजी मंडईत अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. या भाजी मंडई मध्ये येण्यासाठी प्रवेशद्वारावर महात्मा फुले भाजी मंडई नामक फलक असलेली कमान होती . मात्र शहरातील विकास कामाच्या नावाखाली सदरील कमान काढून टाकण्यात आले आहे. काढण्यात आलेली ती कमान पुन्हा उभा करावी या मागणीचे निवेदन मुख्याध्याकारी नगर परिषद अंबाजोगाई यांच्याकडे महात्मा फुले सेवा संघाच्या वतीने देण्यात आले आहे. या निवेदनावर महात्मा फुले सेवा संघाच्या अनेक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात दिलेली याबाबत सविस्तर माहिती अशी की , निवेदनात सर्वप्रथम मनोहर अंबा नगरीत रस्ते व इतर कामाच्या स्वरूपाने जी काही विकास कामे झाली आहेत व होऊ पाहत आहेत . त्यामुळे नक्कीच अंबानगरीच्या वैभवात भरच पडत आहे त्याबद्दल अंबाजोगाई नगर परिषदेचे अभिनंदन केले आहे.
अंबाजोगाई शहरातील भाजी मंडई भागात विकास काम (पाटील चौक ते श्री योगेश्वरी देवी मंदिर सिमेंट मार्ग) दरम्यान, महात्मा फुले भाजी मंडई, अंबाजोगाईची प्रवेश कमान काढण्यात आली होती, ती प्रवेश कमान लवकरात लवकर पूर्णवत लावावी /बसवावी अशी विनंती
महात्मा फुले सेवा संघाच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद अंबाजोगाई यांच्याकडे केली आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेत देण्यात आलेल्या निवेदनावर शरद पांडुरंग माळी , गणेश मूकुंदराव जाधव,गणेश सुंदर आठाव,महेश दादाराव सपाटे,गजानन जगन्नाथ घोडके,
प्रथमेश रमाकांत देशमाने,
नितीन रामराव जिरे, बालासाहेब काशीनाथराव मसने, ऋषिकेश शिवाजीराव पाथरकर,दिनेश
अशोकराव घोडके, अशोक गणपतराव बलुतकर, राम वसंतराव घोडके, वसंत दत्तात्रय घोडके,दत्ता नामदेव राऊत , पंकज गणेश राऊत,बलूतकर नंदकुमार मधुकर ,जिरे अमोल बालासाहेब, पवन प्रकाशराव जिरे, अमोल नागोराव धोडके राम मुकूंद, विशाल वैजनाथ कंठीकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
