*सरपंच देशमुख खून प्रकरणातील आणखी एका आरोपीस पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात, आ संदीप क्षीरसागर यांनी केले कुटुंबियांचे सांत्वन
*सरपंच देशमुख खून प्रकरणातील आणखी एका आरोपीस पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात*
आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
केज – जिल्हा हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग खून प्रकरण तपासात पोलिसांनी आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात बेड्या ठोकल्या. प्रतिक भीमराव घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आसून आज बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
खून केल्यानंतर प्रतिक घुले पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी यापूर्वी जयराम माणिक चाटे (वय २१ रा. तांबवा ता. केज), महेश सखाराम केदार (वय २१ रा. मैंदवाडी ता. धारुर) या दोन आरोपींना अटक केली होती. आतापर्यंत एकूण तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. दरम्यान, प्रतिक घुले यास आज बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान आज बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले व या घटनेचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी केली.
