हंगामी वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; अंबाजोगाई तालुक्यातील घटना
हंगामी वसतिगृहातील १९ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; अंबाजोगाई तालुक्यातील घटना
अंबाजोगाई – तालुक्यातील येलडा येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या हंगामी वसतिगृहातील १९विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
येलडा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह आहे. यावर्षी काही दिवसांपूर्वीच हे वसतिगृह सुरू झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री वसतिगृहातीलविद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. यात वांग्याची भाजी, भात, भाकरी असे पदार्थ होते. रात्ती 12 वाजताच्या नंतर यापैकी काही विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. वसतिगृह कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. सध्या एकूण १९ विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली
विषबाधा झालेल्या रुग्णा मध्ये मुकुंद रामप्रसाद चामनार, प्रतिक्षा रामप्रसाद चामनार, रुपाली बबन वाघमारे, सुरेश बाबू शिंदे, श्रावणी लहू कांबळे, विनोद दशरथ चांमार, क्रांती दशरथ चमनार, अभिषेक रेशीम कांबळे, अशोक भाऊसाहेब कांबळे, स्वाती शिवाजी कांबळे, अनमोल भागवत कांबळे, रितेश शिवाजी कांबळे, सान्वी परमेश्वर चमनार, प्रांजली भागवत कांबळे, सानिया भम्मपाल हतागळे, बुवां मुकुंद चामनार, राघव धम्मपाल हतागले, प्राजल शाजी पाटोळे, श्रुती अविनाश कांबळे, कृष्णा दिगंबर सोनार, राजपाल धम्मपाल हतागळे, अमृता सायली गडदे
