काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात घसा फाटे पर्यंत ओरडणारे भाजप नेते किरीट सोमय्या पडले तोंडघशी भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा एकदा चर्चेत
आयकर विभागाने जप्त केलेली 1055 कोटींची संपत्ती न्यायालयाने मुक्त केल्याने ना अजित पवार यांना मिळाला सुखद धक्का

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात घसा फाटे पर्यंत ओरडणारे भाजप नेते किरीट सोमय्या पडले तोंडघशी भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा एकदा चर्चत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांची विरोधी पक्षात असताना आयकर विभागाने जप्त केलेली 1055 कोटींची संपत्ती न्यायालयाने मुक्त करून सुखद धक्का दिला आणि ना अजित पवार यांच्या सह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात घसा फाटे पर्यंत ओरडणारे भाजप नेते किरीट सोमय्या चांगलेच तोंडघशी पडले असून या निर्णयाने भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसने मधील अनेक बड्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे केले. भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यावेळी अशा भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात दररोज टीव्हीवर येऊन घसा कोरडा पडे पर्यंत ओरडत होते. यावेळी भाजपने ईडी, सीबीआयचा धाक दाखवून आशा सर्व भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेतले आणि याच वेळी उदयास आली ती म्हणजे भाजप ब्रँड असलेली वॉशिंग मशीन.
याच वॉशिंग मशीन मध्ये खेचल्या गेलेले नेते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार. 2021 साली दादा महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री असताना ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी त्यांना नोटीस दिली आणि आय कर विभागाने त्यांची 1055 कोटींची संपत्ती जप्त केली.
या वेळी किरीट सोमय्या माध्यमा समोर येऊन हासत ओरडत होते, “आता पहा काय होतंय अजित पवार जेल मध्ये जाणार, त्यांची बेनामी संपत्ती घोषित झाली ती जप्त झाली मुलगा जय अजित पवार याने काय कारनामे केले तेही आता समोर येणार आहेत” त्या नंतर अजित पवार सह विरोधी पक्षातील लोक किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे दाखवत होते.
त्या नंतर भाजपने शिवसेनेतील काही नेत्यांना वेगवेगळ्या यंत्रणे मार्फत धमक्या, आर्थिक आमिष दाखवून शिवसेना फोडून शिंदे गट आपल्या कडे खेचला आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले. हे सरकार स्थिरावते न स्थिरावते तोच अपल्या वरील संकट टाळण्यासाठी
सन 2023 ला ना अजित पवार महायुती सोबत गेले आणि उप मुख्यमंत्री झाले आणि लोकसभेच्या तोंडावर कर्ज वितरण व कारखाने विक्रीत घोटाळ्याचे पुरावे नसल्याचे स्पष्ट करत आर्थिक गुन्हे शाखेने दादांना क्लीन चिट दिली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशा नंतर दादा 5 डिसेंम्बर ला पुन्हा 6 व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि लागलीच
6 डिसेंम्बर ला न्यायाल्याने त्यांची जप्त केलेली संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले. या संदर्भात किरीट सोमय्या यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता
कोर्टाचा निर्णय अंतिम असतो अशी प्रतिक्रिया दिली. मग किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप कोर्टात का टिकले नाहीत का? सोमय्या डंके की चोट पे सांगत असलेले पुरावे खोटे होते का ?
अजित पवार यांच्यावर आरोप करणारे किरीट सोमय्या हे भाजपचे आता सर्वच भाजप नेते कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत.

किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले दुसरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल सन 2019 मध्ये प्रफुल्ल पटेल वर विमान खात्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. सन 2023 ला अजित पवार सोबत तेही महायुती सोबत सत्तेत गेले आणि मार्च 2024 पुरावे मिळाले नाहीत म्हणून सीबीआयने त्यांची फाईल बंद करत असल्याचा रिपोर्ट कोर्टात सादर केला.
2019 मध्ये भाजपच्या आरोपा वरून मनीलोंडरिंग प्रकरणी इ डी ने त्यांचे 180 कोटीचे फ्लॅट केवळ जप्तच केले नाहीत तर या जप्त केलेल्या फ्लॅट मध्ये इ डीने स्वतःचे कार्यालय उघडले होते.
लोकसभेच्या तोंडावर कोर्टाने ईडीचे आरोप फेटाळ्याने त्यांना दोन्ही फ्लॅट परत मिळाले.
किरीट सोमय्याने भ्रष्टाचाराचे आरोप केलेले तिसरे नेते हसन मुश्रीफ. भाजपने कारखण्या घोटाळा संदर्भात त्यांच्यावर आरोप केले, त्यानंतर मार्च 2023 मध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर ई डीचे 3 छापे पडले. एप्रिल ला कोर्टाने त्यांचा अटक पूर्व जामीन फेटाळला
यावेळी त्यांच्या अटकेची शक्यता असतानाच जुलै 23 मध्ये तेही पवारा सोबत महायुती मध्ये जाऊन मंत्री झाले. लागलीच 11 जुलैला कोर्टाने त्याला अटके पासून संरक्षण दिले यावेळी ईडीच्या वकिलांनी कोर्टा समोर सुनावणी साठी वेळ वाढून मागीतली. त्यावेळ पासून हे प्रकरण आजतागायत थंड आहे.
किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आणखी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, 2014 साली महाराष्ट्र सदन घोटाळ्या वरून भाजपने छगन भुजबळ वर आरोप केले, यात ते जेल मध्येही गेले आणि 2023 ला ते महायुती मध्ये अजित पवार सोबत गेले.
डिसेंम्बर 23 ला केस संथ गतीने सुरू असल्याची कोर्टाने टिपणी केल्या नंतर
ईडीने भजबळांची परदेशी दौऱ्याची केस मागे घेतली. सुनावणी वेळी यांचीकेची प्रत सापडत नसल्याचे कोर्टाला सांगितलं गेलं.
एकूणच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात घसा फाटे पर्यंत ओरडणारे भाजप नेते किरीट सोमय्या चांगलेच तोंडघशी पडले आहेत. यातून सोमय्यांचा अभ्यास खोटा आणि त्यामुळेच दादांना दिलासा मोठा असं म्हणावे लागत असून या निर्णयाने भाजपची वॉशिंग मशीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Post Views: 234