खा.बजरंग सोनवणे यांच्या विरोधात केज मधील पत्रकार एकवटले, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
खा.बजरंग सोनवणे यांच्या विरोधात केज मधील पत्रकार एकवटले, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी
केज दि.३ ( प्रतिनिधी ) बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांबद्दल काढलेल्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असतानाच केज मधील पत्रकारांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.परिणामी खा.बजरंग सोनवणे यांच्या विरोधात केज मधील सर्व पत्रकार एकवटले असून खा.बजरंग सोनवणे यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.याबाबतकेज मधील विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खा.बजरंग सोनवणे यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत केज येथील पत्रकारांनी खा.बजरंग सोनवणे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे.खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांची बायको आणि मुलाचा उल्लेख करत जातीयद्वेषातून व हेतुपुरस्पर जाहीर भाषणातून दडपशाहीची तसेच अश्लील व अनैतिक भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केले आहे.याचा संपूर्ण राज्याभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यामुळे बजरंग सोनवणे व त्यांचे कार्यकर्ते यांचेकडून सदर पत्रकारांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे सदर पत्रकार व पत्रकारांचे कुटुंबिय प्रंचड मानसिक तणावाखाली असून व त्यांचे कुटुंबिय प्रंचड भेदरलेल्या अवस्थेत आहेत.त्यामुळे केज येथील त्या पत्रकारास तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात येऊन बजरंग सोनवणे यांच्यावर अँट्राँसिटी अँक्टसह पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी रितसर केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.परिणामी खा.बजरंग सोनवणे यांच्या या वक्तव्यामुळे पत्रकारांचे कुटुंबिय प्रंचड मानसिक तणावाखाली असून पार भेदरलेल्या अवस्थेत सध्या आहेत. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्यात यावे या मागणीसह खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी.यासह विविध मागण्याचे निवेदन उद्या दि.४ डिसेंबर२०२४ रोजी बुधवारी सकाळी११:००वाजता केज तहसीलदारांना देण्यात येणार आहे. यावेळी सर्व संघटनांचे पत्रकार काळ्या फिती लाऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करणार आहेत.तरी केज मधील सर्व पत्रकारांनी तसेच विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून
चौकटीत –
गुन्हा दाखल करणार -पोलीस निरीक्षक महाजन
दरम्यान याबाबत केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची पत्रकारांनी रात्री पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेतली व रितसर तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी मी एस.पी.साहेबांशी चर्चा करून सकाळी गुन्हा दाखल करतो असे आश्वासन दिले.
पत्रकारांचे कुटुंब हादरले –
खा बजरंग सोनवणे यांनी बीड येथील जाहीर कार्यक्रमात बोलताना केज येथील जेष्ठ पत्रकार, त्याची पत्नी व मुलाबद्दल अनैतिक भाषेत, टीका टिप्पणी केली.यामुळे पत्रकारांचे कुटुंब पार हादरून गेले आहे.या प्रकरणी खा बजरंग सोनवणे यांचे विरुद्ध पत्नीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करावा व कुटुंबाची मानहानी केल्याचा गुन्हा नोंद करावा या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना देण्यात आले.याप्रसंगी उपस्थित असलेले केज येथील सर्व मान्यवर पत्रकार मंडळीसह सर्व जेष्ठ पत्रकार उपस्थित होते.
