बिबट्या आला पळा रे पळा शेतकऱ्या मध्ये घबराट अंबाजोगाई तालुक्यातील तेलघना, पुस आणि जवळगाव पाठोपाठ आता ममदापुर पाटोदा शिवारातही बिबट्या दिसल्याने खळबळ
बिबट्या आला पळा रे पळा शेतकऱ्या मध्ये घबराट
अंबाजोगाई तालुक्यातील तेलघना, पुस आणि जवळगाव पाठोपाठ आता ममदापुर पाटोदा शिवारातही बिबट्या दिसल्याने खळबळ

वन विभागाच्या कर्मचाऱ्या समोर बिबट्याला पकडण्याचे आव्हान
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई तालुक्यातील तेलघना, पुस आणि जवळगाव शिवारातील शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आल्याने तो पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्या समोर एक आव्हान उभा राहिलेले असतानाच काल रात्री
तालुक्यातील ममदापूर व पाटोदा या दोन गावच्या मध्यभागी लेंडी या शिवारात बिबट्या दिसल्याने या परीसरात खळबळ उडाली आसून बिबट्या आला पळा रे पळा म्हणण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे.
अंबाजोगाई शहरालगत असलेल्या बुट्टेनाथ परिसरातील डोंगरदऱ्या मध्ये मागील दहा वर्षांत नागरीकांनी अनेकदा बिबट्या पाहिल्याने आणि या बिबट्याने अनेकवेळा म्हशी, शेळ्यांचा फडशा पाडल्याचे समोर आल्याने वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा ही लावला होता.
मागील काही वर्षे बुट्टेनाथ परिसरात बिबट्या पाहिल्याची केवळ अफवाचं पेव फुटलं होत. त्या नंतर बुधवारी रात्री जवळगाव-पुस शिवारात बिबट्या ऊसाच्या फडातुन बाहेर निघाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी पाहिले आणि गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. याच परिसरातील तेलघणा शिवारात ही बिबट्याच्या पावलाची ठसे हरभऱ्याच्या पिकात दिसून आल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या संदर्भात वनविभागाच्या कर्मचाऱ्यास दुरध्वनीवरून संपर्क साधून बिबट्याच्या वावराची कल्पना दिली.
त्यानूसार अंबाजोगाईचे वनपाल अधिकारी विजया शेंगोटे यांनी त्यांच्या पथकासह पुस व जवळगाव परिसरात जावून त्या भागाची पाहणी केली. तसेच तेथील शेतकऱ्यांना भितीचे कारण नाही असे सांगुन बिबट्या दिसताच शेतकऱ्यांनी स्वरक्षणासाठी शेतात जाताना कुऱ्हाड, विळा, गोफन, कोयता, काट्या या वस्तुंचा वापर करावा. तसेच बिबट्या दिसताच वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वनपाल अधिकारी विजया शिंगोटे यांनी केले असून गुरुवारी रात्री ८ वाजता अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर व पाटोदा या दोन गावच्या मध्यभागी लेंडी या शिवारात बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर झपाट्याने व्हायरल होत आसून बिबट्या पुन्हा आल्याच्या चर्चेने बुट्टेनाथ परिसरात मॉर्निग वॉक साठी जाणाऱ्या अंबाजोगाई शहरातील नागरिका मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
