*सर्वसामान्य आणि वंचितांच्या उपेक्षीत जगण्याला संविधानाने खरा अर्थ दिला :- डॉ राजेश इंगोले
*सर्वसामान्य आणि वंचितांच्या उपेक्षीत जगण्याला संविधानाने खरा अर्थ दिला :- डॉ राजेश इंगोले
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची सामाजीक परिस्थिती आणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक लक्षात येतो याच खर कारण ‘संविधानाची’ देशात अंमलबजावणी हे आहे असे प्रतिपादन डॉ राजेश इंगोले यांनी केले.
तक्षशीला प्रतिष्ठान तर्फे आयोजित ‘संविधान दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष धम्मदीप तरकसे हे होते.
पुढे बोलताना डॉ राजेश इंगोले यांनी तळागाळातील लोकांना स्वातंत्र्य मिळाले किंवा मिळाले नाही याने त्यांच्या जीवनात काहीच फरक पडणार नव्हता कारण गुलामीच्या जगण्यात फक्त मालक बदलल्याने कसलाही फरक पडणार नव्हता. परंतु स्वातंत्र्य समता बंधुता आणि समन्याय या सूत्रानुसार येथील दलित उपेक्षित वंचित वर्ग थेट समाजप्रवाहात आल्याने त्यांच्या सामाजीक आर्थिक शैक्षणिक पात्रतेत आमूलाग्र बदल घडन आला आणि सर्वसामान्य माणसाची पोर शिकून कलेक्टर, डॉक्टर, प्राध्यापक इंजिनीअर आमदार खासदार मंत्री होऊ शकले.
हा सामाजीक बदल झाल्याने वंचीत लोकांच्या मनात आत्मविश्वास आला. संविधानाने महिलांना अनेक अधिकार प्राप्त करून दिले त्यामुळे महिला आज राज्यकर्त्या, शासनकर्त्या झालेल्या दिसतात ही सर्व देणं डॉ बाबासाहेब आंबेडकरानी जी कलम कायदे संविधानाच्या परिशिष्टात टाकले त्याने शक्य झाले.
राज्यकारभार कसा चालवावा, नागरिकांची मूलभूत अधिकार कर्तव्य, निवडणूका, न्यायालये, शासकीय कार्यालये या देशातील प्रत्येक गोष्ट फक्त संविधानाच्या आधारे चालते हा महिमा संविधानाचा आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधान देशाला अर्पण करताना एक गोष्ट बोलले होते की ‘या जगातील सर्वश्रेष्ठ संविधान मी तयार केले आहे परंतु याचा दुरुपयोग करणारी मंडळी जर सत्तेत, आणि प्रशासनात आली तर हे संविधान दुधारी शस्त्र ठरेल. आणी नेमके हेच आज घडत आहे . राज्यपाल आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत आहे, शासकीय संस्था सीबीआय, इडी ,यांचा सर्रास दुरुपयोग होत आहे.
संविधानाने या विविधतेने नटलेल्या देशाला अखंडित ठेवण्याचे काम केले आहे त्यामुळे विविध जाती, धर्म, भाषा, प्रांत असूनही हा देश एकसंघ अखंड राहिला आहे. तसेच संविधानाने जनतेला प्रदान केलेला मतदानाचा अधिकार सर्वसामान्य जनतेला देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती ठरविण्याचा अधिकार देतो असे म्हणत भारतातल्या प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून, समजून घेऊन देशाचा कारभार त्याप्रमाणे सुरू आहे की नाही याचा अभ्यास केला पाहिजे असे मत डॉ राजेश इंगोले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष धम्मदीप तरकसे, सूत्रसंचालन मनीषा कांबळे तर आभार प्रदर्शन गौतम व्हटकर यांनी केले.
