*केज मतदार संघात निवडणूक प्रक्रिया शांततेत व संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा आशा पद्धतीने पार पडल्याने निवडणूक अधिकारी दीपक वाजळे यांनी मानले नागरिकांचे आभार*
केज (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदार संघाचे मुख्य निवडणूक अधिकारी दीपक वाजळे यांच्या मार्गदर्शना खाली निवडणूक प्रक्रिये मधील सर्व अधिकारी, कर्मचारी, कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या जागरुकते मुळे केज मतदार संघात निवडणूक प्रक्रिया संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा आशा पद्धतीने शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आसून मतदार संघातील नागरिकांचे आभार मानले आहेत.
केज विधानसभा मतदार संघातील भाजप महायुतीच्या सौ नमिता अक्षय मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे या दोघासह 25 उमेदवारांचे भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झाले.
केज मतदार संघात 420 मतदान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या एकूण 387221 मतदात्या पैकी 130854 पुरुष आणि 114943 महिला, ईतर 2 अशा एकूण 245799 म्हणजेच टक्केवारी नुसार 63.48 टक्के मतदात्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यात अंबाजोगाई शहरात नोंदल्या गेलेल्या 66465 मतदारा पैकी 41735 मतदारांनी म्हणजे 62.79 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याची नोंद झाली आहे.
बीड चे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अविनाश पाठक व केज विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी दीपक वाजळे यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्य निवडणूक अधिकारी अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे, केजचे तहसीलदार राकेश गित्ते, अंबाजोगाई न प च्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांच्या सह निवडणूक प्रक्रिये मधील सर्व कर्मचारी यांनी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रात नियोजन बद्ध यंत्रणा लावली होती. मतदार संघात कायदा व सुव्यवस्था राबण्याची जबाबदारी ज्यांच्या वरती होती ते अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कमलेश मीना, अंबाजोगाईचे चोरमले,
केज येथील पोलीस निरीक्षक महाजन, अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शना खाली कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या जागरुकते मुळे केज मतदार संघात निवडणूक प्रक्रिया संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा आशा पद्धतीने शांततेत पार पडली. मतदार संघात सर्व जाती धर्माचे मतदार असताना विडा येथे वयक्तिक कारणा हुन झालेल्या भांडना व्यतिरिक्त कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. कुठल्याही मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या, मतदान केंद्र ताब्यात घेतल्याच्या घटना घडल्या नाहीत नागरिकांनी केलेल्या सहकार्या मुळे व मतदान प्रक्रिया शांततेत व लोकशाहीचा सन्मान राखणारी व संपूर्ण राज्याने आदर्श घेणारी ठरल्या मुळे निवडणूक अधिकारी दीपक वजाळे यांनी प्रशासनाच्या वतीने मतदार संघातील सर्व नागरिकांचे आभार मानले आसून निवडणूक निकाला नंतर ही नागरिक संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
