अंबाजोगाई

*केज मतदार संघात निवडणूक ड्युटी साठी आलेल्या भालेराव नामक कर्मचाऱ्याचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुर्देवी मृत्यू*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   पाटोदा येथून अंबाजोगाई शहरात निवडणूक ड्युटी साठी आलेल्या मुकुंद भालेराव नामक कर्मचाऱ्याचा ड्युटी संपुन केज येथे मतदान यंत्र जमा करत असताना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आल्याने स्वा रा ती रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वी दुर्देवी रित्या मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली.
    या विषयी प्राप्त माहिती अशी की,
अहिल्या नगर (अहमद नगर) जिल्हा श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगांव येथील रहिवासी व पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मुकुंद गुलाबराव भालेराव ( वय 56 ) या कर्मचाऱ्याने आपणास शुगर बी पी चा त्रास आसल्याने आपली निवडणूक ड्युटी रद्द करावी या साठी प्रयत्न केले होते तरीही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची ड्युटी रद्द न केल्याने त्यांना काल 20 नोव्हेंम्बर रोजी केज मतदार संघातील अंबाजोगाई शहरात असलेल्या 129 क्रमांकाच्या
मतदान केंद्रावर ड्युटी साठी यावे लागले होते. दिवसभर त्यांनी या मतदान केंद्रावर ड्युटी केल्या नंतर मतदान यंत्र जमा करण्या साठी ते काल रात्री केजला गेले, मतदान यंत्र जमा करत असतानाच दिवस भरातील ताण तणावा मुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्या मुळे केज येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्या नंतर तेथील डॉक्टरांनी त्यांना अंबाजोगाई ला हलवण्याचा सल्ला दिला. भालेराव यांना अंबाजोगाई येथील स्वा रा ती रुग्णालयात आणल्या नंतर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राण ज्योत मालवल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!