परळी वैजनाथ

*ऍड माधव जाधव यांना मारहाण होताच परळी मतदार संघात वंजारा मराठा वाद पेटला* *घाटनांदूर येथे 4 मतदान केंद्रासह बन्सीधर अण्णा सिरसाट यांची गाडी फोडली*

परळी (प्रतिनिधी)
   परळी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचे समर्थक ऍड माधव जाधव हे परळी शहरातील बँक कॉलनी बूथ वर गेले असता त्यांना मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्या सह मतदार संघातील धर्मापुरी या ठिकाणी मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही बंद करून बोगस मतदान सुरू असल्याने संतप्त झालेले  उमेदवार राजेसाहेब देशमुख हे केंद्रातील कर्मचाऱ्यांची झाडा झडती घेत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत असून
घाटनांदूर येथे 4 मतदान केंद्रासह बन्सीधर अण्णा सिरसाट यांची गाडी फोडली. परळी मतदार संघात आणखी बऱ्याच ठिकाणी राडा झाल्याने मतदार संघात वंजारा व मराठा वाद चांगलाच पेटल्याचे चित्र दिसून येत आहे.
      अपेक्षित धरल्या प्रमाणे परळी मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मा धनंजय मुंडे समर्थकांनी आज सकाळ पासूनच काही ठिकाणी बूथ ताब्यात घेण्यास सुरवात केली. धर्मापुरी या ठिकाणी निवडणूक अयोगांच्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकून सीसीटीव्हीचे केबल काढण्यात आले व ठरल्या प्रमाणे मतदान प्रक्रिया सुरू होती. हे वृत्त समजताच महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख घटनास्थळी धावले व हा प्रकार पाहून
संतप्त झालेल्या देशमुखांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडा झडती घेतली.
    परळी शहरातील बँक कॉलनी मध्ये रा कॉ शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व देशमुख समर्थक ऍड माधव जाधव हे गेले असता त्या ठिकाणी मुंडे समर्थकांनी जाधव यांना बेदम मारहाण केली. मतदार संघातील नंदागौळ, जलालपूर या ठिकाणी बोगस मतदान होत असल्याने राडा झाल्याचे वृत्त आहे.
ऍड माधव जाधव यांना मारहाण झाल्याचे समजताच त्याचे पडसाद संपूर्ण मतदार संघात उमटण्यास सुरवात झाली आणि मतदार संघातील घाटनांदूर याठिकाणी संतप्त झालेल्या देशमुख समर्थकानी 4 मतदान केंद्र फोडले या मुळे 2 तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती या घटने बरोबरच बीड जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष बन्सीधर अण्णा सिरसाट यांची गाडी,  आणखी काही गाड्या, चोथेवाडी येथे एक एस टी फोडल्याचे वृत्त आहे. सेलुअंबा येथेही दोन गटात राडा झाल्याचे वृत्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!