*केज मध्ये एकीकडे सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या साठी भाजपची नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा तर दुसरीकडे पृथ्वीराज साठे यांच्या साठी अंबाजोगाई व केज मधुन तरुणांची मोठी फळी मैदानात*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
एकीकडे केज विधानसभा मतदार संघातील भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांच्या साठी भाजपने नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा लावलेली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या साठी अंबाजोगाई व केज मधुन तरुणांची मोठी फळी मैदानात उतरली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार असुन आणखी 2 दिवसांनी 20 नोव्हेंबर रोजी मतदार राजा आपला आमदार निवडण्या साठी लोकशाहीतील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदार संघात भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्यात सरळ लढत होत असताना निवडणुक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदार संघात एकीकडे पृथ्वीराज साठे हे एकाकी पडल्या सारखे चित्र होते तर दुसरीकडे नमिता मुंदडा यांचे पारडे जड वाटत होते. मात्र दुसऱ्या टप्प्यात अंबाजोगाई शहरातून राजकिशोर पापा मोदी व बबन लोमटे तर केज मधुन खासदार बजरंग बप्पा सोनवणे सह माजी आमदार संगीता ठोंबरे, अंजली घाडगे, हारुन भाई इनामदार, सिताताई बन्सोड या बड्या नेत्यांची ताकत मिळाल्याने पृथ्वीराज साठे यांचे पारडे जड दिसू लागले.
या दरम्यान जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी व्युव्हरचना आखली, मतदार संघातील सर्व नाराज गट तट यांना आपलंस करण्या साठी अक्षय मुंदडा यांनी पुढाकार घेतला आणि यात त्यांना यश ही आले त्यामुळे ही लढत तुल्यबळ बनल्या गेली.
प्रचाराच्या तिसऱ्या टप्प्यात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, डॉ प्रीतमताई मुंडे यांनी मतदार संघातील नाराज वंजारी समाजाच्या प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक घेऊन त्यांना नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ कामाला लावले. या सर्वा सह समाज बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी पंकजाताई मुंडे व डॉ प्रीतमताई मुंडे यांनी केज, विडा येवता सर्कल मध्ये नमिता मुंदडा यांच्या साठी जाहीर सभा घेतल्या. अंबाजोगाई मध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना नितीनजी गडकरी यांची सभा घेण्यात आली. याच काळात सौ नमिता मुंदडा यांच्या साठी आर एस एस परिवार व भाजप मधील निष्ठावंत मंडळीही कामाला लागली. अक्षय मुंदडा ही मतदार संघातील छोट्या छोट्या घटका पर्यंत जाऊन पोचले त्यांच्याशी संवाद साधला. एकूणच सौ नमिता मुंदडा यांच्या साठी भाजपने नियोजन प्रचार यंत्रणा लावलेली दिसून आली.
दुसरी कडे सौ नमिता मुंदडा यांच्या विरोधात मतदार संघातील सर्वच विरोधकांनी पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी आपली ताकत लावलेली असताना व त्यांच्या साठी पक्षध्यक्ष जयंत पाटील, आ रोहित पवार सह राज्य सभा खासदार फौजिया खान यांच्या जाहीर सभा घेण्यात आल्या नंतर अंबाजोगाई मधुन राजकिशोर मोदी मित्र मंडळ, दिग्विजय लोमटे मित्र मंडळ केज मधून खा. बजरंग सोनवणे मित्र मंडळातील आणि मुस्लिम समाजातील तरुणांची फळी मैदानात उतरलेली दिसत असून दोन्ही उमेदवारा कडुन भ्रमण ध्वनी मार्फत प्रत्येक मतदारा पर्यंत कॉल करून मतदान करण्या संदर्भात आवाहन करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार व दोघांची प्रचार यंत्रणा, नियोजन पाहता एक रंजतदार सामना केज मतदार संघात पहावयास मिळत आसून मतदार संघात जरांगे फॅक्टर व वंजारा समाज कशा पद्धतीने भूमिका घेतो यावर मतदार संघाचा निकाल अवलंबून राहणार आहे हे मात्र निश्चित.
