*शंभुलिग शिवाचार्य महाराज यांचे नमिता मुंदडा यांना मतदान रूपी आशीर्वाद देण्याचे समाजाला आवाहन..!*
अंबाजोगाई प्रतिनिधी:- केज मतदार संघातील वीरशैव लिंगायत समाजाकडून भाजपाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.यामुळे भाजपाच्या उमेदवार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांचे पारडे अधिक जड झाले आहे.
विधानसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर ठेपली असून नमिता मुंदडा यांना केज मतदार संघातून वाढता पाठिंबा मिळत आहे. केज विधानसभा मतदार संघात विकासाची केलेली असंख्य कामे ही नमिता मुंदडा यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. यावेळी जनता विकासभुमिख नेत्याच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहीली असून त्यात केज मतदार संघातील वीरशैव लिंगायत समाजाकडून भाजपाला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. केज, आडस, अंबाजोगाई, कोळकानडी, मुळेगाव , नायगाव,धनेगाव, युसुफ वडगाव, गांजी, लोखंडी सावरगाव, साळेगाव, जानेगाव सह केज मतदार संघात वीरशैव लिंगायत समाज मोठ्या संख्येने नमिता मुंदडा यांच्या पाठीशी आहे.अंबाजोगाई येथील शंभुलिग शिवाचार्य महाराज यांनी समस्त बांधवांना नमिता मुंदडा यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. भाजप सरकारने महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून यांचा लाभ देखील लिंगायत समाजाला मिळत आहे, शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या समशानभूमी रस्त्याकरिता आ.नमिता मुंदडा यांनी भरघोस निधी दिला आहे. विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. भाजपाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले. परिणामी या निर्णयाचा मोठा फायदा भाजपाच्या विकासभुमिख उमेदवार सौ.नमिता मुंदडा यांना होणार असून मताधिक्यात नक्कीच वाढ होणार आहे. वीरशैव लिंगायत समाज मतदार बांधवांनी भाजपाच्या उमेदवार सौ.नमिता मुंदडा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत असे आवाहन आवाहन शंभुलिग शिवाचार्य महाराज यांनी केले आहे.
