*डॉ.राजेश इंगोले यांच्या खुमासदार भाषणांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारसभांची रंगत वाढवली*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज विधानसभेत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटातर्फे माजी आमदार पृथ्वीराज साठे हे “तुतारी” फुंकणारा माणूस या चिन्हासह केज निवडणुकीच्या रणांगणात उभे आहेत. यावेळी डॉ.राजेश इंगोले यांच्या खुमासदार भाषणांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारसभांची रंगत वाढवली आहे. शनिवारी अंबाजोगाईत आयोजित रोहितदादा पवार यांच्या सभेतील डॉ.राजेश इंगोले यांच्या ‘नोट भी देंगे और वोट भी देंगे’ ही टॅग लाईन विशेष गाजली.
अंबाजोगाईच्या राजकारणाची दिशा ठरविणारे अंबानगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी नुकताच कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेत महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठींबा दिला. याच कार्यक्रमात मोदी यांचे अत्यंत विश्वासू असलेले त्यांचे सहकारी सुप्रसिद्ध मानसोपचार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ, माजी शिक्षण सभापती डॉ.राजेश इंगोले यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात केलेले भाषण प्रचंड गाजले. मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण रचना आणि जोडीला खुमासदार शेरोशायरी, कविता यामुळे डॉ.इंगोले यांचे भाषण म्हणजे रसिक, श्रोत्यांना पर्वणीच असते. डॉ.राजेश इंगोले यांनी मोदी यांनी दिलेल्या पाठींब्यानंतर प्रचारात सक्रिय सहभाग घेत अंबाजोगाई, केज, नेकनूर परिसरात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्यासाठी कॉर्नर मिटिंग्स, बैठका घेत साठे यांना प्रचारात आघाडी घेऊन दिली आहे. डॉ.इंगोले यांनी याआधी विधानसभेची एक निवडणूक लढविल्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहे. त्यांनी त्यांचा हा मित्र, परिवार या निवडणुकीत पृथ्वीराज साठे यांच्या मदतीसाठी भक्कमपणे उभा केला आहे. त्यामुळे ही मदतीची अधिक कुमक साठे यांना या निवडणुकीत मिळाली आहे. डॉ.इंगोले गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर्सच्या विविध प्रश्नांवर अभ्यास करून त्यावर लढा देतात, डॉक्टर्सच्या अनेक प्रलंबीत प्रश्न तसेच वैद्यकीय सेवेत कुण्या डॉक्टरला काही अडचण आल्यास धावून जातात त्यामुळे अंबाजोगाई, केज, नेकनूर परिसरात त्यांना मानणारा डॉक्टर वर्ग तसेच व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांचा सर्वदूर पसरलेला रूग्णवर्ग त्यांच्या शब्दाला मान देऊन साठे यांना निश्चित मदत करणार आहे. डॉ.राजेश इंगोले यांच्या अनोख्या आकर्षक वक्तृत्व शैलीमुळे त्यांच्या भाषणातून जनमत वळविण्याचे सामर्थ्य आहे, तळ्यात मळ्यात असणारा मतदार डॉ.इंगोले यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पृथ्वीराज साठे यांना मदत करण्याच्या सकारात्मक मानसिकतेत येत आहे. त्यामुळे अंबाजोगाई, केज व नेकनूर परिसरात डॉ.राजेश इंगोले यांना आमच्या इथे कॉर्नर मीटिंग्स आणि बैठकांना पाठवा असा आग्रह कार्यकर्ते करीत आहेत. एकंदर मानसोपचार तज्ज्ञ असलेले डॉ.इंगोले हे लोकांच्या मनाचा ठाव घेण्यात व त्यांचे मत परिवर्तन करण्यात यशस्वी होत आहेत. अंबाजोगाई येथील शनिवारी झालेल्या रोहितदादा पवार यांच्या सभेत डॉ.राजेश इंगोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना निवडणुकीसाठी पन्नास हजार रूपयांची मदत करीत समोरील जनसमुदायापुढे ‘नोट भी देंगे और वोट भी देंगे’ ही घोषणा केल्यावर उपस्थित जनसमुदयाने त्यांचे विशेष कौतुक करत टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली. त्यामुळे डॉ.राजेश इंगोले यांच्या खुमासदार भाषणांनी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारसभांची रंगत वाढविली आहे असे सर्वसामान्य कार्यकर्तेच आता बोलून दाखवत आहेत. मुद्देसूद मांडणी, अभ्यासपूर्ण रचना आणि जोडीला खुमासदार शेरोशायरी, कविता यामुळे डॉ.राजेश इंगोले यांचे भाषण म्हणजे रसिक, श्रोत्यांना पर्वणीच आहे.
=======================
=======================
