अंबाजोगाई

*राज्यात महाविकास आघाडीचे 170 आमदार निवडून येणार असून या मध्ये पृथ्वीराज साठे यांचा नंबर असणार*   *रोहित दादा पवार यांचा आत्मविश्वास*

*राज्यात महाविकास आघाडीचे 170 आमदार निवडून येणार असून या मध्ये पृथ्वीराज साठे यांचा नंबर असणार*
  *रोहित दादा पवार यांचा आत्मविश्वास*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
    मोदी शहा आणि महायुती सरकार मधील नेते या राज्यात जाती जाती मध्ये द्वेष निर्मान करण्याचे काम करत असून
ही साधू संतांची भूमी असल्याने त्यांना 440 व्होल्टेज चा झटका बसल्या शिवाय राहणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे 170 आमदार निवडून येणार असून या मध्ये केज मतदार संघाचे पृथ्वीराज साठे यांचा नंबर असणार आहे असा आत्मविश्वास
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा झंजावात रोहित दादा पवार यांनी व्यक्त केला आहे.
   केज विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मा रोहित दादा पवार हे बोलत होते.
    या प्रसंगी खा बजरंग बप्पा सोनवणे,. उषाताई दराडे, माजी आमदार संगीता ठोंबरे, अंजली घाडगे, राजकिशोर मोदी, हारून पटेल, सुरेश तात्या पाटील, डॉ नरेंद्र काळे, बबन लोमटे, संजय भोसले, डॉ राजेश इंगोले, ऍड शिवाजी कांबळे, दिलीप काळे, अमर देशमुख, भाई मोहन गुंड, अंकुश ढोबळे, कॉ बब्रुवान पोटभरे, ऍड इस्माईल गवळी, शैलेंद्र पोटभरे,
व्यंकटेश चामनर, महादेव आदमाने, बन्सी अण्णा जोगदंड, शिवसेनेचे शिवाजी कुलकर्णी, रत्नाकर शिंदे, मदन परदेशी, दिलीप जोशी, सौ संजीवनी देशमुख, अजिंक्य चांदने, रमीज सर, राजेश वाव्हळे, हाजी साहेब, नसरीत बागवान यांच्या सह विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते.
    या वेंळी बोलताना रोहित दादा पवार म्हणाले की, पृथ्वीराज साठे हे 100 टक्के आमदार होणार आहेत, साठे हा साधा माणूस आहे. लोकांसाठी प्रामाणिक पणे काम करणारा माणूस, छोट्या घरात राहनारा आहे. हा फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मानणारा महाराष्ट्र आहे. राज्यात या वेळी 170 आमदार निवडून येणार व या साठी पवार साहेब दररोज 4 सभा घेत आहेत विरोधकांना गोहाटीला पाठवल्या शिवाय राहणार नाहीत.
    मुंबई मध्ये मोदी साहेबांची सभा घेतली 1 लाख खुर्च्या होत्या 20 हजार खुर्च्या भरल्या त्यांनी आता महाराष्ट्र चा नाद सोडला असून महाविकास आघाडी सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेट मिटिंग मध्ये शेतकऱ्यांना 3 लाखाची कर्जमाफी, माता भगिनी साठी 3 हजार महिना करणार आहोत, महिला सुरक्षित कशा राहतील यावर काम केलं जाईल. आज शेतकरी अडचणी, तरुणांना हाताला काम नाही. तेलाच्या किंमती वाढल्या सोयाबीनचा भाव 3400 रु., पवार साहेबांना प्रत्येक शेतकरी महत्वाचा आहे.
    आमदार कुटुंबा कडुन मतदारांचा अपमान केला जातो त्यामुळे साठेना 50 हजार मतांनी निवडून आणायचा आहे.
राज्यात सर्व भरत्या मध्ये भ्रष्टाचार आहे. महायुती सरकार मध्ये राज्यात 50 हजार कोटी पेक्षा जास्त भ्रष्टाचार झाला आहे. केज मतदार संघाचे आमदार सत्तेत असताना शेतकऱ्यांना विमा अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे.
   साठे याना आमदार करा केज मतदार संघात एम आय डी सी आणल्या शिवाय राहणार नाही, येथील दवाखाण्याची दयनीय अवस्था आहे. हे सरकार आणि मोदी, शहा तुम्हा आम्हात द्वेष निर्माण करण्याच काम करत आहेत. ही साधु संतांची भूमी आहे आपल्याला 440 व्हॉट चा झटका बसल्या शिवाय राहणार नाही असा इशारा या वेंळी त्यांनी मोदी शहा यांना दिला
    नवीन युगाचे जनरल डायर म्हणजे देवेंद्र फडणवीस आसून महाराष्ट्र जनता अपल्याला सोडणार नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्या शिवाय राहणार नाही.
    या वेळी राजे भूषणसिंह होळकर यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी भ्रमण ध्वनी हुन उपस्थिताशी संवाद साधला.
   या वेळी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की,  केज मतदार संघात पृथ्वी डोक्यावर घ्यायचं काम केलं आहे. सर्वत्र पाठिंबा दिल्या जात आहे. राक्षसी वृत्ती च्या मानसाला वठणीवर आणण्यासाठी अनेकांनी उमेदवारी मागे घेऊन साठेला पाठिंबा दिला. धनदांडगी शक्ती समोर आहे, मी आणि माझ कुटुंब ही त्यांची पार्टी आहे. माझ्या वर टीका करताना म्हंटले रस्त्यावर फिरू देणार नाही. होहुन जाऊन जायचं तर होऊन जाऊ द्या. या वेळी त्यांनी नितीन गडकरी यांच्या सभेत अक्षय मुंदडा यांच्या सभेत केलेल्या आरोपाचे खंडन करत त्यांचा भरपूर समाचार घेतला.
    या वेळी बोलताना उमेदवार पृथ्वीराज साठे म्हणाले की, कर्जत जामखेड मतदार संघात दादांनी हेवा वाटावा असा विकास केला, तरुण महिला यांना रोजगार उपलब्ध करून दिला. मतदार संघाचे प्रश्न सुटले नाहीत, जिल्हा, एम आय डी सी मुळे रोजगार संधी, मुंदडा कुटुंबाचा विकास झाला. शेतकऱ्यांना प्रक्रिया करणारा उद्योग व्हावा ही अपेक्षा फोल ठरली, सिंचन सुविधा वाढल्या नाहीत. बुटेनाथ साठवण तलाव झाला तरच सिंचनाचा प्रश्न सुटेल.
    विकास केला तर केंद्रीय मंत्र्याला माझ्या विरोधात कशा साठी आणलं हा सवाल त्यांनी या वेळी मुंदडा यांना केला.
    या वेळी पारुबाई पांडे यांच्या तर्फे 50 हजार, डॉ राजेश इंगोले यांच्या तर्फे 50 हजार, कैलास लव्हरी यांच्या तर्फे 75 हजार रु यांच्या सह आणखी काही नागरीकांनी पृथ्वीराज साठे यांना मदत देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!