*केज मतदार संघातील मक्तेदारी मोडीत काढण्या साठी पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करा* *नगरसेवक पती दिलीप काळे यांचे आवाहन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघातील मक्तेदारी मोडीत काढण्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीचे शांत संयमी व्यक्तिमत्व असलेले उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी नगरसेवक पती दिलीप काळे यांनी अंबाजोगाई शहर वासीयांना केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या कॉर्नर बैठकीत बोलताना दिलीप काळे यांनी विरोधकांवर हल्ला चढवला, आम्ही पूर्वी पासून स्व. गोपीनाथ राव मुंडे व भारतीय जनता पक्षाला मानणारे कार्यकर्ते होतो, मुंडे साहेबांच्या निधना नंतर आ पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही प्रामाणिक पणे काम करत होतो. सन 2014 च्या निवडणुकी मध्ये भाजपा उमेदवार माजी आ संगीताताई ठोंबरे व त्या नंतर 2019 च्या निवडणुकी मध्ये भाजपा उमेदवार व विद्यमान आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या विजया साठी आम्ही सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले.
मात्र निवडणूक झाल्या पासून मागील 5 वर्ष माझ्या सह भाजपच्या सर्व नगरसेवकांना आणि भाजप च्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यास मुंदडा परीवारा कडुन सतत अपमानास्पद वागणूक मिळत होती, केज मतदार संघात मुंदडा यांनी भाजप पक्ष वाढवण्या ऐवजी निष्ठावंताला बाजूला करून आपल्या पुरता मर्यादित केला.
लोकसभा निवडणुकी मध्ये ही पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारा साठी निष्ठावंत कार्यकर्त्यास यंत्रणा पुरवली गेली नाही.
एकूणच पावलो पावली होणारा अपमान सहन होत नसल्याने मी, सरपंच अनिल शिंदे, दीपक शिंदे, भारतराव पतंगे सह असंख्य कार्यकर्त्यांनी माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या मर्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला असून पक्षाने केज मतदार संघात दिलेले उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे हे अत्यन्त शांत संयमी, रस्त्यावरील सामान्य कार्यकर्ता आसल्याने आम्ही त्यांच्या पाठीशी आपली ताकत उभा केली आहे. केज मतदार संघातून संगीता ताई ठोंबरे, अंजली ताई घाडगे सह राजकिशोर पापा मोदी, बबन भेय्या लोमटे, हारून भाई इनामदार, सिताताई बन्सोड, बाबुराव पोटभरे, कॉ बब्रुवान पोटभरे यांच्या सह अनेक दिगग्ज नेत्यांची ताकत पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी तयार झाली असून मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे त्यामुळे मतदार संघात परिवर्तन हे अटळ आहे आणि त्यामुळेच केज मतदार संघातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी नगरसेवक सौ संगीता ताई काळे यांचे पती दिलीप काळे यांनी अंबाजोगाई शहर वासीयांना केले
Post Views: 136