अंबाजोगाई

*छ. शिवाजी महाराज चौकामध्ये लावलेल्या ” आता फक्त रामकृष्ण हारी” या फ्लॅक्स ने सर्वांचे लक्ष वेधले*

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावलेला “रामकृष्ण हारी” हा डिजिटल बोर्ड सर्वांचे लक्ष वेधून घेत असून लोकसभा निवडणुकीच्या वेळी “रामकृष्ण हारी आणि वाजवा तुतारी” ही बीड जिल्ह्यात गर्जलेली घोषणा पुन्हा एकदा विधान सभा निवडणुकीच्या माध्यमातून चर्चेस आली आहे.

चार महिन्या पूर्वी संपूर्ण देशभरासह बीड जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकी मध्ये बीड जिल्ह्यातील लोका मध्ये बदलाचे वारे वाहताना दिसू लागले होते. जिल्ह्यात जरांगे फॅक्टरने जोर धरलेला होता तरही जिल्ह्यातील ओबीसी नेते केवळ अपल्याच जातीचा उद्धार करत असल्याने व मायक्रो ओबीसी मधील छोट्या अल्पसंख्याक जातिकडे दुर्लक्ष करत असल्याने मायक्रो ओबीसी मध्ये ही ओबीसी नेत्या विषयी चीड होती म्हणून मायक्रो ओबीसीनेही जिल्ह्यात गर्जू लागलेल्या “रामकृष्ण हारी वाजवा तुतारी” या घोषणेच्या सुरात सूर मिसळून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला होता.

आज महाराष्ट्र राज्या सह केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच रंगात आली असून मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धुरळा उडाला आहे.‌ मतदारसंघात  मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या युक्त्या वापरत आसून अंबाजोगाई शहरात विविध राजकीय पक्षांच्या प्रचार‌फेऱ्यांनी शहर दणाणून जात आहे. सोशल मीडियावर सत्ताधारी व विरोधक यांच्या कार्यकर्त्यांचे आरोप -‌ प्रत्यारोप देखील मोठ्या प्रमाणात होत असून राजकीय पक्षांचे पदाधिकारी,‌ कार्यकर्ते आपल्या नेत्याची, पक्षाची बाजू मांडताना दिसून येत आहेत.

अंबाजोगाई सह केज मतदार संघात निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आसताना निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अंबाजोगाई शहरात जोमाने सुरू असलेली चर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या फ्लेक्सची.

या चौकातील पोस्ट ऑफिस समोर लावण्यात आलेला हा फ्लॅक्स येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष केंद्रित करत आहे आणि याचे कारण म्हणजे या फ्लॅक्स वर केवळ आणि केवळ लिहल्या गेलं आहे ‘आता फक्त “रामकृष्ण हारी”.

हा फ्लेक्स कोणी लावला, हे‌ अद्याप समोर आले नसून सर्वांचे लक्ष आजू बाजूला लावण्यात आलेल्या सौ नमिता ताई मुंदडा व पृथ्वीराज साठे यांच्या फ्लॅक्स कडे न जाता बाजूला लावण्यात आलेल्या ‘आता फक्त रामकृष्ण हारी…’ या वाक्याच्या फ्लेक्स कडे जात आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असताना ‘आता फक्त रामकृष्ण हारी…’हे‌‌ वाक्य लिहिलेले हे फ्लेक्स केज मतदार संघाच्या निवडणूकीचे वातावरण बदलण्यास आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे केज विधान सभेचे उमेदवार माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना विजयाच्या उंबरठ्यावर पोचवतात का? याचे उत्तर 23 नोव्हेंबर ला मिळणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!