अंबाजोगाई

*माजलगावच्या निवडणूक रिंगणात दंड थोपटलेले रमेशराव आडसकर यांचा संघर्ष काही पिछा सोडेना, व्होटिंग मशीन मध्ये त्यांच नाव 28 व्या क्रमांकावर*

माजलगांव (प्रतिनिधी)
    माजलगाव मतदार संघातील आपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना संघर्ष काही पिछा सोडताना दिसत नसून त्यांच्या साठी मतदार संघात वातावरण सकारात्मक असतानाही व्होटिंग मशीन मध्ये त्यांच नाव हे 28 व्या क्रमांकावर जाऊन बसल्याने आडसकरासाठी ही एक डोकेदुखी ठरणार आहे.
   पूर्वी पासून संघर्ष हा रमेश आडसकर यांच्या पाचवीला पुजलेला असून ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला त्याच्या दुसरे दिवशी पासून केज मतदार संघ हा राखीव झाला जो की आज पर्यंत राखीवच आहे.
     रमेशराव लोकसभा निवडणूक लढले, विधानसभा निवडणूक लढले दोन्ही वेळा त्यांना अपयश आलं तरी ते खचून न जाता दुसरे दिवशी पासून आपल्या माणसांच्या सुख दुःखात रमत राहिले. माजलगाव मतदार संघात मागील विधानसभा निवडणूकी मध्ये थोड्या मताने पराभव पत्करावा लागल्याने या मतदार संघात त्यांचा जुनाच संसार असल्याने व सर्व सामान्य लोकांना केंद्र बिंदू मानून स्व. बाबुरावजी आडसकर साहेबांनी काम केल्याने तसचं पुढेही काम करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे विचार आता संपुष्टात आल्याने रमेश अडसकर हे या वेंळी माजलगाव मतदार संघात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरून माजलगावच्या मायबाप जनतेला आशीर्वाद मागत आहेत.
     आडसकरांना शह देण्यासाठी  या मतदार संघात रा कॉ अजित पवार गट म्हणजेच महायुती कडुन प्रकाश दादा सोळंके, रा कॉ शरदचंद्र पवार गट म्हणजे महाविकास आघाडी कडुन मोहनराव जगताप या शिवाय अपक्ष म्हणून माधव निर्मळ, बाबरी मुंडे ही दिगग्ज मंडळी निवडणूक रिंगणात आहे.
     या निवडणुकीत रमेश आडसकर यांच्या पाठीशी कुठलीही राजकीय पक्षाची ताकत नसताना अपक्ष म्हनून रिंगणात डाव लावलेल्या अडसकरांच्या यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे अशोक डक, शिवसेनेचे आप्पासाहेब जाधव, बाबुराव पोटभरे यांच्या सह अनेक छुप्या नेत्यानी आपली ताकत लावली आहे हे जरी खरं असले तरी माजलगाव मतदार संघात आपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या रमेशराव आडसकर यांचा संघर्ष काही पिछा सोडताना दिसत नसून त्यांच्या साठी मतदार संघात वातावरण सकारात्मक असतानाही व्होटिंग मशीन मध्ये त्यांच नाव हे 28 व्या क्रमांकावर जाऊन बसले आहे. या मतदार संघात जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 34 उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी तीन मशीन असणार आहेत. आडसकरासाठी ही एक डोकेदुखी ठरणार आसुन त्यांचं नाव हे दोन नंबर मशिन मध्ये खालून दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    त्या मुळे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदाराची नजर सर्व प्रथम पहिल्या व्होटिंग मशीन वर आणि तेही वरच्या बाजूस जाते. बाकी दुसरीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नसतो आणि याच ठिकाणी माजलगाव मतदार संघात घोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    या साठी अडसकरांच्या प्रचार यंत्रनेने आपले चिन्ह कोणत्या मशीनवर कुठे आहे याचा डेमो दाखवुन चिन्हा विषयी मतदारांना अधिक जागरूक करण्याची आवश्यकता आहे. एकूणच रमेशराव आडसकर यांना संघर्ष काही पिछा सोडताना दिसत नसून त्यांच्या साठी मतदार संघात वातावरण सकारात्मक असतानाही व्होटिंग मशीन मध्ये त्यांच नाव हे 28 व्या क्रमांकावर जाऊन बसल्याने आडसकरासाठी ही एक डोकेदुखी ठरणार आहे हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!