*बहुजन विकास मोर्चा, मा क प, लोकजन शक्ती पार्टी व प्रहारच्या वतीने पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा* *पत्रकार परिषदेत बाबुराव पोटभरे सह सर्वांची घोषणा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघातील मागील 35 वर्षाची मक्तेदारी, हुकूमशाही मोडीत काढण्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ पृथ्वीराज साठे यांना बहुजन विकास मोर्चाच्या वतीने जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी आयोजित पत्रकार परिषदे मध्ये केली. या प्रसंगी कॉ बब्रुवान पोटभरे यांनी मा क प च्या वतीने राजेश वाव्हळे यांनी लोकजन शक्ती पार्टीच्या वतीने तर फिरोज शेख यानी प्रहारच्या वतीने पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिशोर मोदी, बबन भेय्या लोमटे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, हारून भाई इनामदार, मा क प चे कॉ बब्रुवान पोटभरे, अशोक गंडले, विनोद शिंदे, महादेव आदमाने यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी मुंदडा यांच्यावर टीका करताना बाबुराव पोटभरे म्हणाले की, मागील 5 वर्षात मतदार संघ बदनाम झाला तो टक्केवारी व गुत्तेदारीमुळे आज केज मतदार संघाला एक नाही तर तीन तीन आमदार असून केज मतदार संघातील त्यांची हुकूमशाही खत्म करण्याची वेळ आली आहे, मागील 2 वर्षात मतदार संघात साडेतीन हजार कोटीची कामे झाली मात्र यातील अनेक कामे कागदावर झाली, गुत्तेदारा सोबत त्यांची भागीदारी असून सर्व समाजाचे लोक वैतागले आहेत, मतदार संघातील जनतेचा विचार करून बहुजन विकास मोर्चाने पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून साठे 50 हजार मतांनी निवडून येतील असा मला विश्वास आहे. मी पक्ष पाठिंबा देत नसून सर्वच मतदार संघात ज्या उमेदवारा कडे विकासाचे व्हिजन आहे अशा उमेदवारास पाठिंबा देत असल्याचे पोटभरे म्हणाले.
या वेळी बोलताना हारून इनामदार म्हणाले की पृथ्वीराज साठे हे जनसामान्यातील उमेदवार असून केज मध्ये झालेल्या मेळाव्यातून साठे यांच्या विजयावर शिक्का मोर्तब करण्यासाठी
सर्वांनी एक मोठं बांधली आहे. या वेळी त्यांनी स्व विमलताई यांची आठवण करून देत त्यांच्या व आजच्या काळात जमीन अस्मानचा फरक आहे असे सांगितले.
या वेळी बोलताना कॉ बब्रुवान पोटभरे म्हणाले की, मतदार संघात 35 वर्षात ज्यांची मक्तेदारी आहे त्यांना मतदार संघातील गाशा गुंडाळावा लागणार आहे.
या वेळी बोलताना राजकिशोर पापा मोदी म्हणाले की केज मतदार संघातील अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी साठे यांना आमचा पाठिंबा आसल्याचे सांगितले.
