*अंबाजोगाई आगारात डिझेल नसल्याच्या कारणा हुन 50 ते 60 बसेस जागेहून हालल्याच नाहीत, प्रवाशांची उडाली चांगलीच तारंबळ*
*अंबाजोगाई आगार प्रमुखाचा कारभार म्हणजे “आंधळ दळत कुत्र पिठ खात” वृत्त ताजे असतानाच*
*अंबाजोगाई आगारात डिझेल नसल्याच्या कारणा हुन 50 ते 60 बसेस जागेहून हालल्याच नाहीत, प्रवाशांची उडाली चांगलीच तारंबळ*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
“झुंजार न्यूज” चे कालच अंबाजोगाई आगार प्रमुख अमर राऊत यांचा कारभार “आंधळ दळत कुत्र पिठ खात” असा असल्याचे वृत्त प्रकाशित होते न होते तोच काल आगारात डिझेल नसल्याच्या कारणा हुन 50 ते 60 बसेस जागेहून हालल्या नसल्याचा प्रकार उघडकीस आला व या मुळे अंबाजोगाई बस स्थानका मधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारंबळ उडाल्याचे वृत्त आहे.
“झुंजार न्यूज” चे कालच अंबाजोगाई आगार प्रमुखाचा कारभार “आंधळ दळत कुत्र पिठ खात” असा असल्याचे वृत्त प्रकाशित करून आगारातील मेकॅनिक विभागाचे प्रमुख (ए डब्लू एस) धस यांचा मेकॅनिकल विभागातील कामगारांवर वचक नसल्याचे वाहतूक निरीक्षक (टी आय) पल्लेवाड हे काही कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक देत असल्याचे आणि या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे असे आगार प्रमुख अमर राऊत यांचा यंत्रणेवर काडी मात्रही वचक राहिला नसल्याने नादुरुस्त बसेसमुळे कोणत्या वेळी कोणत्या बसेसचा अपघात होईल आणि कोणाचा बळी जाईल याचा काडी मात्र भरोसा राहिला नसल्याने आगार प्रमुखा सह येथील अधिकारी हे कामगार व प्रवाशांच्या जीवाशी खेळतायत का असा प्रश्न उपस्थित केला होता.
