भाजपात प्रवेश करणार्या प्रत्येकाला योग्य सन्मान व न्याय देणार – अक्षय मुंदडा*
*_आ.नमिता मुंदडांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत तरूणाईचे भाजपात जोरदार इन्कमींग_*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदारसंघ निवडणूक – २०२४ साठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. मतदानासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असताना दिवसेंदिवस आ.मुंदडा यांना जनतेचा भरघोस प्रतिसाद, पाठींबा व आर्शिवाद लाभत आहे. शहरातील प्रभाग क्रं.१ मधील गांधीनगर, परिसरातील जय बजरंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी आ.नमिता व अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केला.
प्रवेश करणार्या सर्वांचे अक्षय मुंदडा यांनी आई निवासस्थानी सहर्ष स्वागत केले. लोकनेत्या आ.पंकजाताई, माजी खा.डॉ.प्रितमताई, ज्येष्ठ नेते काकाजी, आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणार्या व भाजपात प्रवेश करणार्या प्रत्येकाला योग्य सन्मान व न्याय देणार असल्याचे अक्षय मुंंदडा यांनी सांगितले. यावेळी गांधीनगर प्रभाग क्रं.१ मधील प्रकाश चव्हाण, धनंजय देवकर, रमेश चव्हाण, किरण देवकर, ज्ञानेश्वर चव्हाण, अविनाश चव्हाण, अमोल पवार, धनराज पवार, राहुल देवकर, लखण चव्हाण, अशोक चव्हाण, राजेश देवकर, अभिषेक चव्हाण, आनंद पवार, संतोष पवार, उमेश पवार, विशाल पवार, अजय चव्हाण, रवी धोत्रे, सोनाची चौघुले, दादासाहेब चव्हाण व जय बजरंग ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे युवा कार्यकर्ते प्रताप देवकर, भाजयुमोचे शहराध्यक्ष संजयभाऊ गंभीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*गांधीनगर (ढोर गल्ली) परिसरातील युवकांचा भाजपात प्रवेश :*
अंबाजोगाई शहरात होत असलेली दर्जेदार विकास कामे पाहून आ.नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अक्षय भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन इंगळे यांच्यासह असंख्य युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केला. प्रवेश करणार्या सर्वांचे अक्षय मुंदडा यांनी सहर्ष स्वागत केले. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सारंगभाई पुजारी व समीर लाटा हे उपस्थित होते.
=======================
*नोट – सोबत फोटो.*
=======================
