*माजी आ पृथ्वीराज साठे केज मतदार संघाचे मागील सर्व रेकॉर्ड तोडून विजयी होतील—खा बजरंग सोनवणे*
मान्यवरांच्या हस्ते श्री योगेश्वरी देवीला श्रीफळ फोडून आरती करून प्रचाराचा धुमधडाक्यात शुभारंभ
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आ पृथ्वीराज साठे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज खा बजरंग सोनवणे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्री योगेश्वरी देवीला श्रीफळ फोडून आरती करून धुमधडाक्यात करण्यात आला.
माजी आ पृथ्वीराज साठे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी खा बजरंग सोनवणे यांच्या समवेत डॉ नरेंद्र काळे, माजी आ संगीता ठोंबरे, अंजली घाडगे, माजी नगराध्यक्ष राजकीशोर पापा मोदी, माजी उपाध्यक्ष बबन लोमटे, मनोज लखेरा, अमर देशमुख, दिलीप काळे, संजय भोसले, दीपक शिंदे, भारत राव पतंगे, मदन परदेशी, ऍड शिवाजी कांबळे, संजीवनी देशमुख, अशोक मोदी,
या वेळी बोलताना खा बजरंग सोनवणे म्हणाले की, महाविकास आघाडीचे केज मतदार संघाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना आदरनिय शरदचंद्र पवार साहेबांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून संधी दिली आहे. साठे यांच्या साठी मतदारांनी माझ्या प्रमाणेच निवडणूक ही हातात घेतली आहे, आमचा हा सर्व साधारण उमेदवार मतदार संघाचे मागील सर्व रेकॉर्ड तोडून विजयी होतील. आज पर्यंत मतदार संघात फक्त गुत्तेदाराचा विकास झाला आहे त्यामुळे मतदार संघाच्या विकासासाठी साठे यांना विजयी करून सेवेची संधी द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी साठे यांच्या विजया साठी पूर्ण ताकती निशी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केले.
या नंतर वार्ड न 9 मधुन वाजत गाजत व तुतारीची गर्जना करत प्रचार रॅली काढण्यात आली.
Post Views: 230