*मायक्रो ओबीसीला बेदखल केल्या मुळे पंकजाताई मुंडे यांना लोकसभेला पराभव पत्करावा लागला*
*विधानसभेला जो पक्ष आणि उमेदवार मायक्रो ओबीसीची दाखल घेईल त्याच्याच पारड्या मधून विजयाचा गुलाल उधळला जाणार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड लोकसभा मतदार संघात मायक्रो ओबीसीला बेदखल केल्या मुळे भाजप महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना पराभव पत्करावा लागला हा इतिहास ताजा असल्याने विधानसभा निवडणुकी मध्ये जो पक्ष आणि उमेदवार मायक्रो ओबीसीची दाखल घेईल त्याच्याच पारड्या मधून विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे.
चार महिन्या पूर्वी देशात लोकसभा निवडणूका झाल्या यात जरांगे फॅक्टर मुळे बीड जिल्ह्यासह राज्यात मतांचे ध्रुवीकरण होणार हे चित्र निवडणूकी पूर्वीच स्पष्ट झाले होते आणि तसेच घडले. लोकसभेच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात जरांगे फॅक्टर मुळे तर मराठा विरुद्ध वंजारा हे चित्र स्पष्ट पणे समोर आले होते. या निवडणुकी मध्ये दलित मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमानावर मते ही महाविकास आघाडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात पडली आणि हे होणार याची पूर्व कल्पना असतानाही भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी भाजपाला वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या ओबीसी मधील ज्या छोट्या छोट्या जाती (मायक्रो ओबीसी) आहेत त्यांना “घरकी मुर्गी दाल बराबर” समजून बेदखल केलं.
मायक्रो ओबीसीची कुठ तरी दखल घ्यावी या संदर्भात वर्तमान पत्र व सोशल मिडिया मधून पंकजाताई मुंडे, त्यांचे स्टार प्रचारक व अजित पवार गटाचे नेते आणि परळी विधान सभेचे उमेदवार मा ना धंनजय मुंडे यांना अनेक वेळा सुचितही करण्यात आले. मात्र या दोन्हीही नेत्यांनी मायक्रो ओबीसीला कचरा समजून बेदखल केलं. त्या मुळेच की काय मायक्रो ओबीसी घटकातील मतदारांनी पक्ष व उमेदवार न पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पारडयात आपली अमूल्य मत पडली आणि बजरंग सोनवणे यांना गुलाल लागला, पंकजाताई मुंडे यांना पराभव पत्करावा लागला.
बीड जिल्ह्यासाठी हा इतिहास ताजा असल्याने दिवसेंदिवस रंगू लागलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये सर्वच मतदार संघात जो पक्ष आणि उमेदवार मायक्रो ओबीसीची दाखल घेईल त्याच्याच पारड्या मधून विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे याची नोंद राजकीय पक्ष व त्यांच्या उमेदवारांनी घ्यायला हवी हे मात्र निश्चित.
