अंबाजोगाई

*केज मतदार संघात प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांची निवडणुकी मधून माघार खा सुप्रिया ताई सुळे व बीडचे खा बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईला आले यश, माजी आ पृथ्वीराज साठे यांना मिळाली बळकटी*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा काही मिनिटांचा कालावधी शिल्लक राहिला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खा सुप्रिया ताई सुळे व बीडचे खा बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईने केज मतदार संघातील प्रबळ अपक्ष उमेदवार माजी आमदार प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्या मुळे केज मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आ पृथ्वीराज साठे यांना बळकटी मिळाली आहे.
    केज विधानसभा मतदारसंघात प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी यापुर्वी 2014 च्या झालेल्या तिरंगी लढतीत भाजपाच्या तिकीटावर विजय मिळवून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत भाजपाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्या निवडणूक रिंगणातुन बाहेर पडल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत सुरुवातीलाच त्या सक्रीय झाल्या होत्या. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या त्या संपर्कात होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी केज विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे माध्यमांना
सांगितले होते. त्यामुळे प्रा. संगीता ठोंबरे यांना दिसणारा आशेचा किरण ही धुसर झाला होता.
   यासर्व पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज वापस घेण्यासाठी काही मिनीटांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खा सुप्रिया ताई सुळे व बीडचे खा बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाई मुळे डॉक्टर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा संगीता ताई ठोंबरे यांनी निवडणुकी मधून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान माजी आमदार प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतल्या मुळे केज मतदार संघात माजी आ पृथ्वीराज साठे यांना बळकटी मिळाली आहे हे मात्र निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!