*दीपावली फराळ वाटप करून प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने केली स्वा रा ती रुग्णालयातील रुग्णांची दिवाळी साजरी*
स्वतः चे दुःख विसरून इतरांच्या सुखदुःखात सहभागी होणे हीच खरी मानवता :- अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- स्वतः चे सुख किंवा दुःख विसरून इतरांच्या सुखदुःखात सामील होणे हीच खरी मानवता असल्याची भावना स्वा रा ती रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांनी व्यक्त केली. ते अंबाजोगाई शहरातील प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने दिपावली निमित्त स्वा रा ती येथील रुग्णांना फराळाचे वाटप करतांना बोलत होते. स्वा रा ती येथील रुग्ण व नातेवाईक यांची दिवाळी गोड होण्यासाठी त्याना फराळाचे वाटप प्रियदर्शनी क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संस्थापक राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील ३५ वर्ष अविरतपणे प्रियदर्शनी क्रीडा मंडळ हे रुग्णसेवेची सामाजिक परंपरा जोपासण्याचे कार्य करीत आहे. हीच परंपरा पुढे जोपासत आज गुरुवार दि.३१ ऑक्टोबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालय येथील रूग्णांना राजकिशोर मोदी मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.
गेल्या ३५ वर्षापासून आजपर्यंत अखंडीतपणे स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयातील रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दिवाळी फराळ वाटपाची परंपरा प्रियदर्शनी क्रीडा मंडळाची आहे. आपण दीपावलीच्या सणापासून कुठेतरी दूर आहोत अशी भावना रूग्णांची व नातेवाईकांची होवू नये या सामाजिक दायित्वातून तसेच रुग्ण व नातेवाईक यांची रुग्णालयातील मानसिकतेतून त्यांना बाहेर काढून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याची परंपरा मंडळाने सुरू केली आहे. दीपावली निमित्त फराळ वाटपात गेली ३५ वर्ष सातत्य टिकवलेले आहे याबद्दल अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे यांनी प्रियदर्शनी क्रीडा मंडळाचे संस्थापक राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रियदर्शनी क्रीडा मंडळाची स्थापना यांनी १९८९ साली केली गेली. तेंव्हाच्या सर्व तरूण सहकार्यांनी मंडळामार्फत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस केला.त्याचाच एक भाग म्हणून स्वा रा ती येथील रुग्णांसाठी हा दिपावली फराळ वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. ज्याचा सकारात्मक असा परिणाम रुग्ण व त्या रूग्णांचे नातेवाईक यांच्यावर दिसून आला .
राजकिशोर मोदी हे प्रियदर्शनी क्रीडा मंडळ तथा इतर संस्थांच्या माध्यमातून गेली ४० ते ४५ वर्ष सातत्याने वेगवेगळ्या घटकावर काम करत आहेत. ज्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी बालझुंबड ,महारक्तदान शिबीर, कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वाटप, कोरोना योद्धा सन्मान, निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी वॉकेथॉन ही व अशी अनेक सामाजिक , शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवित असून याकामात त्यांना सर्व सहकार्यांचे पाठबळ मिळत आहे. म्हणूनच हे उपक्रम आजतागायत अविरतपणे सुरू आहेत. दिवाळी फराळ वाटप करत असताना रूग्णांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याचे काम मोदी यांचे सहकारी करत आहेत .
दिपावली निमित्त स्व रा ती येथे फराळ वाटपाच्या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ.शंकर धपाटे, डॉ.नागेश अब्दगिरे, ऍड विष्णुपंत सोळंके, मनोज लखेरा, महादेव आदमाने,अमोल लोमटे , दिनेश भराडीया, धम्मा सरवदे , चंद्रकांत गायकवाड, सुनील वाघाळकर ,माणिक वडवणकर, गणेश मसने, कचरू सारडा,बबन पानकोळी, रुपेश चव्हाण, अकबर पठाण , अशोक देवकर, काझी खयामोद्दीन , अंकुश हेडे, विजय रापतवार , राजू मोरे, सुधाकर टेकाळे, मतीनं जरगर, गोविंद पोतंगले, सुभाष पाणकोळी , अकबर पठाण, मुक्तार शेख, खलील जाफरी, सय्यद ताहेर, सचिन जाधव, शाकेर काझी, जावेद गवळी,दत्ता सरवदे, विशाल पोटभरे, सय्यद रशीद , आकाश कऱ्हाड, शुभम लखेरा, नियामत पठाण, कैलास कांबळे, सुदाम देवकर, जमादार पठाण , शाहिद शेख, महेबूब गवळी, विशाल जगताप, विश्वजित शिंदे ,जावेद इस्माईल गवळी, अजीम जरगर ,वजीर भाई, दत्ता हिरवे, शुभम लखेरा,सुशील जोशी, रोहन कुरे, आशिष ढेले, जावेद भाई, रोहित हुलगुंडे, मुन्ना वेडे, सुशील जोशी, मारुफ शेख, कपिल संकाये, रोशन लाड यांच्यासह प्रियदर्शनी क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सहकारी , राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि राजकिशोर मित्र मंडळाचे सर्व सहकारी सदस्य उपस्थित होते.
