अंबाजोगाई

*दीपावली सणानिमित्त नागरिकांची भेट घेऊन संवाद साधत आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी जनतेस दिल्या शुभेच्छा*

=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, एसआरपी व इतर मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी मंगळवारी आणि बुधवारी अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांची भेट घेऊन संवाद साधत त्यांना दीपावली सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. जागोजागी आ.मुंदडा यांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वागत करण्यात आले.

केज विधानसभा मतदारसंघासाठी भाजप – महायुतीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी मंगळवारी आणि बुधवारी अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांची विविध ठिकाणी भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ठिकठिकाणी संवाद साधताना आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, केजच्या जनतेने २०१९ मध्ये मला सर्वप्रथम आमदार केले मिळालेल्या संधीचे मी व मुंदडा कुटुंबियांनी आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशिर्वादाने विकास कामे करून सोने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मागील पाच वर्षांत आम्ही जनतेसाठी पूर्ण वेळ उपलब्ध राहिलो आहोत. या काळात आमचे मार्गदर्शक काकाजी, अक्षयजी व मी आम्ही जनतेची तत्परतेने सेवा केली. आता पाच वर्षे संपली आहेत. आम्ही पुन्हा नव्याने परीक्षेसाठी सज्ज झालो आहोत. आम्हाला विश्वास आहे. की, जनता आम्हाला या परीक्षेत ही पुन्हा उत्तीर्ण करेल. जनता आम्हाला परत एकदा पाच वर्षांसाठी निवडून देईल. सर्वांना सोबत घेऊन काम करीत असताना सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका कालही होती आजही कायम आहे. जनता आम्ही केलेल्या विकासकामांना समोर ठेवून नक्कीच आम्हाला मतदानरूपी आशिर्वाद देतील. आम्ही महायुती म्हणून सर्वांना सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. विकास हाच आमचा मुख्य मुद्दा, अजेंडा आहे. आम्ही कुटुंबियांनी जनतेशी पाच वर्षांत सातत्यपूर्ण जनसंपर्क ठेवला आहे. मूलभूत सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या पाच वर्षांत जे करता आले नाही. ते पुढील पाच वर्षांत करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी विविध ठिकाणी व्यक्त केला. आशीर्वाद जनतेचा, आणि वसा केज विधानसभेच्या प्रगतीचा घेऊन आम्ही काम करीत आहोत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (ए), एसआरपी व इतर मित्र पक्ष महायुतीच्या २३२ केज विधानसभेच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी, नमिता अक्षय मुंदडा केज विधानसभेतील जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा निवडणूक लढवित आहे. आपण सदिच्छा, शुभेच्छा व आशिर्वाद द्या अशी साद आ.मुंदडा यांनी उपस्थितांना घातली. यावेळी त्यांनी छत्रपती नगर येथील नागरिकांशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांच्या अनुषंगाने विविध विषयांवर संवाद साधला. तसेच नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. अंबाजोगाई येथील पेशवा प्रतिष्ठान यांच्या वतीने, उद्योग आरंभ महा एक्स्पो – २०२४ ला भेट देऊन दिवाळी विषयक वस्तूंच्या खरेदीची प्रक्रिया व माहिती जाणून घेतली. या निमित्ताने उपस्थित नागरिक बंधू-भगिनी यांच्याशी संवाद ही साधला. तसेच अंबाजोगाई येथील जैन गल्लीत भगवान महावीर यांच्या आरतीस उपस्थित होते. यावेळी महिला, पुरूष आदी समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान लहान मुलांनी विविध स्पर्धेत सहभाग घेऊन यश संपादन केल्याबद्दल त्यांना पारितोषिके दिली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या भाविक भक्तांनी आमदार मुंदडा यांचा सत्कार केला व विविध विषयांवर संवाद ही साधला. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

=======================
*नोट – बातमी सोबत फोटो.*
=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!